अ‍ॅपशहर

रस्त्यावरील मुलांवर प्रत्येकी ५० हजार खर्च

शहरातील रस्त्यांवर वास्तव्य करणाऱ्या आणि काम करून पोट भरणाऱ्या सहा ते अठरा या वयोगटातील मुलांसाठी पालिकेने दिवस-रात्र निवारा प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पांतर्गत प्रत्येक मुलावर दर वर्षी ५० हजार रुपये खर्च करत असल्याची माहिती समोर आली आहे.

Maharashtra Times 19 Jun 2018, 3:08 pm
म. टा. प्रतिनिधी, पुणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम children


शहरातील रस्त्यांवर वास्तव्य करणाऱ्या आणि काम करून पोट भरणाऱ्या सहा ते अठरा या वयोगटातील मुलांसाठी पालिकेने दिवस-रात्र निवारा प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पांतर्गत प्रत्येक मुलावर दर वर्षी ५० हजार रुपये खर्च करत असल्याची माहिती समोर आली आहे.

पालिकेचा समाजविकास विभाग आणि हैदराबाद येथील रेनबो फाउंडेशन यांनी गेल्या वर्षी रस्त्यांवर राहणाऱ्या कुटुंबातील मुले आणि भीक मागणाऱ्या मुलांचे सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये सुमारे १०, ४२७ मुले रस्त्यावर राहत असल्याची धक्कादायक आकडेवारी पुढे आली होती. पैकी ६,०५३ मुले तर, ४,३४७ मुली होत्या. त्यातील निम्म्याहून अधिक मुले शाळेत जात नसल्याने तसेच त्यांना लिहिता वाचताही येत नसल्याचे दिसून आले होते.

रस्त्यावर वस्तूंची विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या मुलांसाठी महापालिका, शिक्षण विभाग तसेच रेनबो फाउंडेशन आणि बजाज फिनसर्व्ह कंपनीमार्फत दिवस-रात्र निवारा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. शहरात जवळपास वीस ठिकाणी हा प्रकल्प राबविण्यात येतो. त्यासाठी पालिकेच्या शाळांमधील रिकाम्या असलेल्या वर्गखोल्या, बंद पडलेल्या शाळा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या प्रकल्पाच्या रेनबो या संस्थेशी करार करण्यात आला असून, प्रायोगिक तत्वावर १५०० मुलांसाठी सुमारे ९.९५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज