अ‍ॅपशहर

काचेला तडा गेला, सात तास विमान रखडले

विमानाच्या काचेला तडा गेल्यानं पुणे विमानतळावर स्पाईस जेटचं विमान सात तासापासून रखडले आहे. त्याचा ४० उद्योगपतींसह सर्वच प्रवाशांना फटका बसला आहे.दर दोन तासांनी विमान उड्डाण घेणार असल्याची घोषणा केली जात असल्याने सात तासापासून विमानतळावर तिष्ठत बसलेल्या प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

Maharashtra Times 22 Feb 2017, 3:33 pm
मटा ऑनलाइन वृत्त । पुणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम spicejet plane delayed on pune airport
काचेला तडा गेला, सात तास विमान रखडले


विमानाच्या काचेला तडा गेल्यानं पुणे विमानतळावर स्पाईस जेटचं विमान सात तासापासून रखडले आहे. त्याचा ४० उद्योगपतींसह सर्वच प्रवाशांना फटका बसला आहे.

आज सकाळी ७.२० वाजता विमानतळावरून विमान निघणार होतं, पण ८ वाजता बोर्डिंग सुरु केलं. २० मिनिटांनी प्रवाशांना पुन्हा खाली उतरवलं आणि १०.३० वाजता विमान निघेल असं प्रवाशांना सांगण्यात आलं. पुन्हा १२.३० वाजता आणि आता३.३० वाजता विमान उड्डाण घेणार असल्याचं प्रवाशांना सांगण्यात आलं. दर दोन तासांनी विमान उड्डाण घेणार असल्याची घोषणा केली जात असल्याने सात तासापासून विमानतळावर तिष्ठत बसलेल्या प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

विमानाच्या पुढच्या काचेला तडा गेला आहे, ती बदलल्यावरच विमान सोडण्यात येईल, अशी माहिती देण्यात येत आहे. पण आधी काच तडकलेली असताना तसंच घेऊन जाणार होता का?, असा सवाल प्रवाशांनी केला. त्यावर मग काचेला सेलो टेप लावून विमान उडवायचे का? असा उर्मट सवाल विमान प्रशासनाने केला. त्यामुळे प्रवासी अधिकच संतापले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज