अ‍ॅपशहर

ग्रामपंचायत निवडणुकांचा धुराळा; पण सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती

राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडत आहे. यानंतर सहकारी संस्थ्यांच्या निवडणुका होतील, अशी अपेक्षा होती. पण राज्य सरकारने ३१ मार्चपर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली आहे.

महाराष्ट्र टाइम्स 18 Jan 2021, 2:51 am
म. टा. प्रतिनिधी, पुणेः राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांची ( co operative society elections ) तयारी सुरू झाली असतानाच, राज्य सरकारने करोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ३१ मार्चपर्यंत या निवडणुकांना स्थगिती दिली आहे. त्यामुळे प्रलंबित असलेल्या ४५ हजार २७६ सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार नसल्याने स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम election
ग्रामपंचायत निवडणुकांचा धुराळा; पण सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती


करोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे जिल्हा निवडणूक आराखडे तयार करण्यात आले होते. १८ जानेवारीपासून या संस्थांच्या निवडणुकांच्या प्रक्रियेला सुरुवात केली जाणार होती. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने याबाबतचे आदेश दिले होते. मात्र, राज्य सरकारने पुन्हा स्थगिती दिली आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राज्य सरकारने वेळोवेळी सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली आहे. ३१ डिसेंबर २०२० रोजी ही मुदत संपली होती.

दरम्यान, सहकारी संस्थांनी मासिक सभा या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा अन्य डिजिटल पर्यायांचा वापर करून घेण्याचा; तसेच निवडणुका होईपर्यंत विद्यमान संचालक मंडळ कार्यरत ठेवण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यमान संचालक मंडळांकडून संबंधित सहकारी संस्थांचे कामकाज सुरू राहणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज