अ‍ॅपशहर

अॅबॅकस प्रशिक्षणात हस्तक्षेपाची मागणी

महापालिका शिक्षणमंडळाच्या विद्यानिकेतन शाळेतील विद्यार्थ्यांना ‘अॅबॅकस’चे प्रशिक्षण देण्यासाठी विशिष्ट संस्थेला काम देण्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्याचा निर्णय स्थायी समितीने मंगळवारी आहे. हे प्रशिक्षण मोफत देण्यासाठी काही संस्था तयार अ‌सताना उधळपट्टी कशासाठी असा प्रश्न शहरातील स्वयंसेवी संस्थांनी विचारला आहे.

Maharashtra Times 28 Jul 2016, 5:50 am
उधळपट्टी थांबविण्यासाठी आयुक्तांना साकडे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम stop abacus training for students
अॅबॅकस प्रशिक्षणात हस्तक्षेपाची मागणी


म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिका शिक्षणमंडळाच्या विद्यानिकेतन शाळेतील विद्यार्थ्यांना ‘अॅबॅकस’चे प्रशिक्षण देण्यासाठी विशिष्ट संस्थेला काम देण्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्याचा निर्णय स्थायी समितीने मंगळवारी आहे. हे प्रशिक्षण मोफत देण्यासाठी काही संस्था तयार अ‌सताना उधळपट्टी कशासाठी असा प्रश्न शहरातील स्वयंसेवी संस्थांनी विचारला आहे.
पालिका आयुक्तांनी यामध्ये हस्तक्षेप करून हा प्रकार थांबवावा, अशी मागणी या संस्थांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे. पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना अॅबॅकसचे प्रशिक्षण देण्यासाठी वर्षाला १.३० कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मान्य करण्यात आला. महापालिका प्रशासनाने याबाबत सकारात्मक अभिप्राय दिल्याने समितीने हा निर्णय घेतल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी सांगितले होते. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मोफत देण्याची तयारी काही संस्थांनी दाखविलेली असतानाही याकडे दुर्लक्ष करून हा खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही पुणेकरांच्या पैशाची उधळपट्टी असून, याची संपूर्ण चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर, विश्वास सहस्त्रबुद्धे यांच्यासह नागरिक चेतना मंचचे सेवानिवृत्त मेजर जनरल सुधीर जठार, पीएमपीएमएल प्रवासी मंचाचे जुगल राठी, कनीज सुखरानी यांनी महापालिका आयुक्त कुमार यांच्याकडे केली आहे.
..

प्रस्तावाचा फेरविचार?
काही संस्था मोफत प्रशिक्षण देण्यास तयार असताना कोट्यवधी रुपये खर्च करून विशिष्ट संस्थेला हे काम देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करणे, हे अत्यंत चुकीचे आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या प्रस्तावाला विरोध असून याचा फेरविचार करावा, असा प्रस्ताव देण्यात येणार असल्याचे पक्षाचे पालिकेतील गटनेते किशोर शिंदे यांनी सांगितले. समितीच्या बैठकीत मनसेच्या सभासदांनी याला पाठिंबा दिल्याने त्याची चौकशी सुरू असून प्रस्तावाची अंमलबजावणी करू नये, अशी मागणी आयुक्त कुमार यांच्याकडे करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज