अ‍ॅपशहर

मौजमजेसाठी वाहने चोरणाऱ्यांना अटक

भारती विद्यापीठ पोलिसांनी तीन वाहनचोरांना पकडून त्यांच्याकडून सात वाहने जप्त केली आहेत. त्यातील आरोपी हा अल्पवयीन असून हे सर्वजण मौजमजेसाठी वाहने चोरत असल्याचे तपासात समोर आले आहे.

Maharashtra Times 17 May 2017, 11:38 am
पुणे : भारती विद्यापीठ पोलिसांनी तीन वाहनचोरांना पकडून त्यांच्याकडून सात वाहने जप्त केली आहेत. त्यातील आरोपी हा अल्पवयीन असून हे सर्वजण मौजमजेसाठी वाहने चोरत असल्याचे तपासात समोर आले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम stunted vehicles for fun
मौजमजेसाठी वाहने चोरणाऱ्यांना अटक


‌हृषीकेश सिद्धार्थ नंदुरे (वय १९, रा. संतोष नगर, कात्रज), दाश्या उर्फ दशरथ सिद्धाराम गायकवाड अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. तर गायकवाड याचा अल्पवयीन साथीदार याला ताब्यात घेतले आहे. यातील गायकवाड व अल्पवयीन मुलगा यांनी तब्बल सहा वाहने चोरल्याचे समोर आले आहे. पोलिस कर्मचारी सर्फराज देशमुख यांना मिळालेल्या माहितीवरून उपनिरीक्षक समाधान कदम, अमोल पवार, कुंदन शिंदे यांच्या पथकाने या दोघांना अटक केली. तर, नंदुरे हा त्रिमूर्ती चौकातून जात असताना पोलिसांना संशय आला. त्याला गाडी थांबविण्याचा इशारा केला असता तो पळून जाऊ लागला. त्याला पाठलाग करून पोलिसांनी पकडले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज