अ‍ॅपशहर

पोलिस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

स्वारगेट विभागात गणेश उत्सवात बंदोबस्ताचे काम करत असताना गुन्हे शाखेतील सहायक फौजदार उदय मोरे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला.

Maharashtra Times 4 Sep 2017, 3:00 am
पुणे : स्वारगेट विभागात गणेश उत्सवात बंदोबस्ताचे काम करत असताना गुन्हे शाखेतील सहायक फौजदार उदय मोरे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांचे सख्खे भाऊ उमेश मोरे हे देखील पुणे पोलिस दलात कार्यरत आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sub inspector uday more died due to heart attack
पोलिस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू


उदय मोरे हे सध्या गुन्हेशाखा युनिट दोनमध्ये कार्यरत होते. त्यांना स्वारगेट विभागात बंदोबस्ताचे काम देण्यात आले होते. दुपारनंतर ते बंदोबस्तात असताना त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. मोरे हे १९८१मध्ये पोलिस शिपाई म्हणून पुणे शहर पोलिस दलात भरती झाले. त्यानंतर त्यांनी विविध पोलिस ठाण्यांमध्ये काम केले. गुन्हेगारांच्या गुन्ह्यांची पद्धतीची मोरे यांना चांगली जाण होती. त्यामुळे त्यांनी काही काळ दहशतवादविरोधी पथकात काम केले. सध्या ते सहायक फौजदार पदावर कार्यरत होते. त्यांचे वडील देखील पुणे पोलिस दलात कार्यरत होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज