अ‍ॅपशहर

धन्य आम्ही भट देखियला..

गझलकार सुरेश भट यांच्या गझल, कवितांमधून विश्वाचे दुःख प्रकट झाले. त्यांनी दुःखाशी मैत्री केली. स्त्रियांचे मनोविश्व त्यांनी जितक्या कुशलतेने व्यक्त केले, तितके मराठी साहित्यात कुणालाही जमले नाही, अशा सुरेश भटांचा सहवास मिळाल्याने ‘धन्य आम्ही भट देखियला’ अशी भावना हृदयात दाटून येते,’ असे सांगून आगामी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी सुरेश भटांच्या साहित्याचे पैलू उलगडले.

Maharashtra Times 14 Jan 2017, 3:00 am
प्रदीप निफाडकर लिखित ‘सुरेश भट आणि’ या पुस्तकाचे प्रकाशन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम suresh bhat pradeep nifadkar
धन्य आम्ही भट देखियला..

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘गझलकार सुरेश भट यांच्या गझल, कवितांमधून विश्वाचे दुःख प्रकट झाले. त्यांनी दुःखाशी मैत्री केली. स्त्रियांचे मनोविश्व त्यांनी जितक्या कुशलतेने व्यक्त केले, तितके मराठी साहित्यात कुणालाही जमले नाही, अशा सुरेश भटांचा सहवास मिळाल्याने ‘धन्य आम्ही भट देखियला’ अशी भावना हृदयात दाटून येते,’ असे सांगून आगामी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी सुरेश भटांच्या साहित्याचे पैलू उलगडले.
नंदिनी पब्लिकेशन हाउसतर्फे प्रकाशित व प्रदीप निफाडकर लिखित ‘सुरेश भट आणि’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. काळे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्यांनी सुरेश भटांच्या साहित्याचा मागोवा घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी माहिती आयुक्त विजय कुवळेकर, ज्येष्ठ कथाकार भारत सासणे, सुरेश भट यांच्या पत्नी पुष्पा भट, नंदिनी तांबोळी आदी या वेळी उपस्थित होते.
‘भटांनी गझलांना मोठे केले आणि गझलांनी भटांना मोठे केले. त्यांची कविता कालोत्तीर्ण राहिली. भटांनी दुःखाला जवळ करण्याच्या वृत्तीने सगळ्या दुःखितांचा भोग अंगावर घेतला,’ असे सांगून काळे यांनी भटांच्या गझलांचे दाखले दिले. मिर्झा गालिब, मीर यांच्या शायरीतील शेर ऐकवून त्यांनी भट यांच्या जगण्याचा आणि साहित्याचा आढावा घेतला. ‘सुरेश भट हे लोकांशी समरस झाले होते. त्यामुळे त्यांनी शोषितांच्या अन्यायाला वाचा फोडली. सामान्य माणसांना भोगाव्या लागणाऱ्या दुःखाला आवाज फोडण्याची किमया त्यांना साधता आली,’ याकडे काळे यांनी लक्ष वेधले.
कुवळेकर म्हणाले, ‘निफाडकर यांनी सुरेश भट यांच्या जीवनाचा मांडलेला पट हा अधुनिक काळातील मराठी गझलेच्या प्रवासाचे, मराठी साहित्यव्यवहाराच्या अलीकडच्या काळाचे एक चित्र आहे. गुरूवरची निष्ठा, प्रेम, आदर हल्ली क्षणात बदलला जातो, अशा काळात निफाडकर यांच्यासारख्या शिष्याने आपल्या गुरूचे चरित्र लिहिणे ही उल्लेखनीय बाब आहे.’ प्रदीप निफाडकर यांनी पुस्तक लिहिण्यामागची भूमिका विषद केली. आनंद देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज