अ‍ॅपशहर

तापमानाचा पारा ‘चाळिशी’कडे

शहरात गेल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली असली, तरी दोन दिवसांत उन्हाची तीव्रता वाढली असून तापमानाचा पारा आता चाळिशीच्या उंबरठ्यावर आला आहे. पुण्यात सोमवारी दिवसभरात या हंगामातील उच्चांकी ३९.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मंगळवारी आकाश अंशतः ढगाळ राहणार असून पारा चाळीस अंश ओलांडेल, अशी शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स 14 Apr 2020, 6:56 am
पुणे : शहरात गेल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली असली, तरी दोन दिवसांत उन्हाची तीव्रता वाढली असून तापमानाचा पारा आता चाळिशीच्या उंबरठ्यावर आला आहे. पुण्यात सोमवारी दिवसभरात या हंगामातील उच्चांकी ३९.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मंगळवारी आकाश अंशतः ढगाळ राहणार असून पारा चाळीस अंश ओलांडेल, अशी शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pune


एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच उन्हाने रंग दाखवायला सुरुवात केली असून सोमवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान चाळीस अंशांच्या पुढेच नोंदवले गेले. बहुतेक जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ होते; तर काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. राज्यातील उच्चांकी तापमान ४३ अंश सेल्सिअस जळगावमध्ये आणि नीचांकी तापमान २०.६ अंश सेल्सिअस महाबळेश्वरमध्ये होते.

पुण्यामध्ये सोमवारी २२.३ अंश सेल्सिअस किमान आणि ३९.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवसांत कमाल तापमानात वाढ होणार असून आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज