पुणे : पुणे ग्रामीण दहशतवादविरोधी पथक आणि ओतूर पोलिस ठाणे यांनी कारवाई करून ओझरमध्ये १५ तलवारींसह एकाला ताब्यात घेतले. पुणे ग्रामीण दहशतवादविरोधी पथकाचे सहायक निरीक्षक अर्जुन मोहिते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून, जुन्नर तालुक्यातील ओझर येथून सोमनाथ राजाराम साळुंके (वय २६, रा. धनगरवाडी, ता. जुन्नर) हा कारखाना फाट्यावरून ओतूरच्या दिशेने दुचाकीवरून निघाला होता. तेव्हा सापळा लावून त्याला १५ तलवारींसह ताब्यात घेतले. साळुंकेवर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत.
पंधरा तलवारींसह आरोपी ताब्यात
पुणे ग्रामीण दहशतवादविरोधी पथक आणि ओतूर पोलिस ठाणे यांनी कारवाई करून ओझरमध्ये १५ तलवारींसह एकाला ताब्यात घेतले...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Aug 2019, 4:00 am