जनता वसाहत येथील रहिवासी श्यामराव धोत्रे (वय ४६) यांचा दुर्घटनेत मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच कुटुंबीयांनी आणि सहकाऱ्यांनी ससून रुग्णालयात धाव घेतली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा आहे. श्यामराव दहा ते १२ वर्षांपासून मोबाइल विक्रेत्याकडे नोकरी करीत होते. सध्या ते फडकेहौद येथील विक्रेत्याकडे नोकरी करीत होते. मोबाइल डिलिव्हरी किंवा अन्य कामासाठी त्यांना बाहेर जावे लागत होते. शुक्रवारी ते आरटीओकडून येत असताना, ही दुर्घटना झाली, असे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले.
घरचा कमावता गेला...
जनता वसाहत येथील रहिवासी श्यामराव धोत्रे (वय ४६) यांचा दुर्घटनेत मृत्यू झाला...
Maharashtra Times 6 Oct 2018, 4:00 am