अ‍ॅपशहर

नगर रस्त्याचा गोंधळ कायम

म टा...

Maharashtra Times 10 Sep 2018, 4:00 am

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नगर रस्त्यावरील मेट्रो मार्गाचे काम सुरू करण्यासाठी महापालिकेत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत कुठलाही निर्णय न झाल्याने गुंजन चौक व शास्त्रीनगर चौकातील प्रस्तावित दुहेरी उड्डाणपुलाबाबतही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या रस्त्यावरील जलद बस वाहतुकीचे (बीआरटी) स्थलांतर करावे लागणार असून, त्याबाबतही या बैठकीत कोणताच निर्णय झाला नाही.

महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीस महापालिका, वाहतूक पोलिस आणि महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे (महामेट्रो) अधिकारी उपस्थित होते. नळस्टॉपच्या धर्तीवर नगर रस्त्यावर दुहेरी उड्डाणपुलाचा आग्रह भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी धरला आहे. या उड्डाणपुलामुळे महापालिकेवर कोट्यवधी रुपयांचा बोजा पडण्याची भीती आहे. या ठिकाणचा मेट्रो मार्ग सध्याच्या 'बीआरटी'तून जात असल्याने काही काळासाठी बीआरटी बंद राहणार आहे. महापालिकेने या बदलांना परवानगी दिल्यानंतरच महामेट्रोला येथे मेट्रो मार्गाचे काम सुरू करणे शक्य होणार आहे. मात्र, आयुक्तांनी घेतलेल्या बैठकीत कोणताही निर्णयच झाला नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज