पुणे : अवधूत तानाजी पाटील याने नवी दिल्लीत इंटरनॅशनल ट्रायथलॉन क्लबतर्फे आयोजित ट्रायथलॉन स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला. विशाल शर्मा याने प्रथम तर, एस. के. पांडे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. अवधूतने १४ तास आणि ५६ मिनिटे अशी वेळ नोंदविली. यात त्याने ३.८ किलोमीटर अंतराच्या जलतरणात १ तास २१ मिनिटे व २५ सेकंद, १८० किलोमीटर अंतराच्या सायकलिंगमध्ये ७ तास ३६ मिनिटे व ४१ सेकंद, तर ४२ किलोमीटर अंतराच्या धावण्याच्या शर्यतीत ५ तास ४८ मिनिटे व ११ सेकंद वेळ नोंदविली. विशालने १३ तास ४ मिनिटे व ४९ सेकंद वेळ नोंदविली.
अवधूतचे यश
अवधूत तानाजी पाटील याने नवी दिल्लीत इंटरनॅशनल ट्रायथलॉन क्लबतर्फे आयोजित ट्रायथलॉन स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला विशाल शर्मा याने प्रथम तर, एस...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Feb 2020, 4:00 am