म. टा. वृत्तसेवा, मंचर
मीना नदीच्या बंधाऱ्यावर पोहायला गेलेली तीन मुले बेपत्ता झाली असून, शोध कार्य हाती घेण्यात आले आहे. नदीच्या किनाऱ्यावर त्यांचे कपडे, मोबाइल, चपला सापडल्या आहेत. 'एनडीआरफ'च्या मदतीने मुलांचा शोध घेण्यात येत आहे. आंबेगाव तालुक्यातील शिंगवे पारगाव येथे दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.
यश राजेंद्र वाव्हळ (वय १६), वैभव चिंतामण वाव्हळ (वय १६), श्रेयस सुधील वाव्हळ (वय १६ सर्व रा. शिंगवे पारगाव, ता. आंबेगाव) अशी बेपत्ता मुलांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारची सुट्टी असल्याने ही मुले पोहोण्यासाठी नदीवर गेली होती. बराच वेळ झाला तरी ते घरी न आल्याने घरच्यांनी तपास केला असता नदीच्या बाजूला त्यांचे कपडे आढळून आले. याबाबत पोलिस पाटील यांनी माहिती दिली.