अ‍ॅपशहर

‘ती’ विमा योजना फसवी

मिळकतकर भरणाऱ्यांना पाच लाख रुपयांचा विमा देण्याची महापालिका प्रशासनाची योजना फसवी असून, कोणताही अभ्यास न करता केवळ लोकप्रिय फसव्या घोषणा करण्यासाठीच सत्ताधारी भाजपने ही योजना सादर केल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे.

Maharashtra Times 11 Jan 2018, 4:19 am
अभ्यास न केल्याची मनसेची सत्ताधारी भाजपवर टीका
महाराष्ट्र टाइम्स.कॉम this insurance policy are wrong
‘ती’ विमा योजना फसवी


म. टा. प्रतिनिधी, पुणे

मिळकतकर भरणाऱ्यांना पाच लाख रुपयांचा विमा देण्याची महापालिका प्रशासनाची योजना फसवी असून, कोणताही अभ्यास न करता केवळ लोकप्रिय फसव्या घोषणा करण्यासाठीच सत्ताधारी भाजपने ही योजना सादर केल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे.
काही ठरावीक लोकांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी प्रस्तावित विमा योजनेला अामचा विरोध असून, नागरिकांमध्ये नवीन वर्ग निर्माण करणारी ही योजना राबवू नये अशी मागणी पक्षाचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी केली आहे. महापालिकेचा मिळकतकर नियमितपणे भरणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विमा उतरविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी ही जाहीर केली. त्यासाठी अर्थसंकल्पात दहा कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली.
नागरिकांना पाच लाख रुपयांचा विमा देण्यासाठी नक्की किती हप्ता भरावा लागेल, यासाठी पालिकेने निविदा प्रक्रियाही सुरू केली आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. याबाबतचे वृत्त ‘मटा’ने प्रसिद्ध केले होते. प्रशासनाच्या कर्तव्यांचे काय, सध्या मनपा प्रशासनासमोरील प्रश्न काय, मनपाची आर्थिक परिस्थिती कशी आहे, याकडे सत्ताधाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. ठरावीक व्यक्तींचे हितसंबंध जोपासण्याच्या मानसिकतेतून ही योजना आणण्यात आली आहे कि काय, अशी शंका येत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. भ्रष्टाचाराला वाव असणारी आणि नागरिकांमध्ये नवीन वर्ग निर्माण करणारी योजना पालिकेने राबवू नये, अशी मागणी शिंदे यांनी आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज