अ‍ॅपशहर

रेल्वे अपघातात महिलेसह दोन चिमुरड्यांचा मृत्यू

रेल्वेरूळ ओलांडताना कोयना एक्सप्रेसच्या धडकेत दोन चिमुरड्यांसह महिलेचा करूण अंत झाला. रविवारी पिंपरी रेल्वे स्थानकात सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. अद्याप तिन्ही मृतांची ओळख पटली नव्हती. गेल्या तीन दिवसात पाच जणांचा रेल्वेखाली सापडून मृत्यू झाला आहे.

Maharashtra Times 12 Nov 2017, 7:32 pm
मटा ऑनलाइन वृत्त । पुणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम three people killed in railway accident at pimpri railway station
रेल्वे अपघातात महिलेसह दोन चिमुरड्यांचा मृत्यू

रेल्वेरूळ ओलांडताना कोयना एक्सप्रेसच्या धडकेत दोन चिमुरड्यांसह महिलेचा करूण अंत झाला. रविवारी पिंपरी रेल्वे स्थानकात सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. अद्याप तिन्ही मृतांची ओळख पटली नव्हती. गेल्या तीन दिवसात पाच जणांचा रेल्वेखाली सापडून मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे अंदाजे वय २५ वर्षे असून, मुलगा व मुलीचे (अंदाजे वय ७ ते ९) वर्षे आहे. मृत महिला लोणावळ्यावरून पुण्याला जाणाऱ्या लोकलमधून उतरली. त्यानंतर रूळ ओलांडताना लोकलच्या पाठीमागून दुसऱ्या दिशेने जाणाऱ्या कोयना एक्सप्रेसखाली सापडून तिघे चिरडले. तीन दिवसात पाच जणांनी जीव गमावला आहे.

पिंपरी रेल्वे स्थानावर घडलेली ही पहिलीच घटना नाही. मागील तीन दिवसात एका अंपगासह पाच जणांनी रुळ ओलांडताना जीव गमावला आहे. काही वर्षांपूर्वी चिंचवड येथील एका मंदिराचे काम करण्यासाठी आलेल्या सात कारागिरांचा एक्सप्रेसखाली सापडून अशाच प्रकारे मृत्यू झाला होता. तसेच रेल्वेरूळ ओलांडताना वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी रूळ ओलांडण्यासाठी पुलाचा वापर करावा असे आवाहन पोलिस आणि प्रशासनाने करून देखील त्याकडे नागरिक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज