अ‍ॅपशहर

Video: खंडाळा घाटात थरारक घटना; ब्रेक फेल ट्रक घाटाच्या उतारावरून चालू लागला अन्...

Khandala Ghat News: सोलापूरहून कलंबोलीकडे येणाऱ्या एका ट्रकचे खंडाळा घाटात ब्रेक निकामा झाले. त्यानंतर हा ट्रक घाट उतारावरून वेगाने चालू लागला. या घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Dec 2022, 9:32 pm
पुणे: एखाद्या गाडीचा ब्रेक फेल झाल्याच्या अनेक बातम्या किंवा व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. पण शुक्रवारी खंडाळा घाटात एक भयानक घटना घडली. सोलापूरहून कळंबोलीकडे जाणाऱ्या एका ट्रकचे ब्रेक फेल झाले. त्यानंतर हा ट्रक घाटाच्या उतारावरून चालू लागला. ही थरारक घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम goods truck


या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार ट्रक चालक संजय यादव हे सिमेंटच्या गोण्या घेऊन सोलापूरहून कळंबोळीकडे जात होते. खंडाळा घाटात ट्रकचे ब्रेक फेल झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. संजय यादव यांनी गाडी नियंत्रणात आणली आणि हॅड ब्रेकच्या सहाय्याने ती घाटात एका बाजूला उभी केली.

वाचा- अश्लील व्हिडिओमुळे नापास झालो, ७५ लाखांची भरपाई द्या; कोर्टात जे काही झाले त्यावर विश्वास बसणार...

ट्रकमधून खालू उतरून चालक संजय खाली उतरले तेवढ्यात हॅडब्रेक देखील निकामी झाला आणि ट्रक आपोआप चालू लागला. घाटाच्या उतारावर कोणाचेच नियंत्रण नसलेला ट्रक वेगाने धावू लागला. ट्रक चालू लागताच चालकाने मागील गाड्यांना थांबवले. घाट उतारावर ट्रक वेगाने अमृतांजन पुलाच्या पुढे गेला आणि बोरघाट पोलिस चौकीच्या पुढे रस्त्याच्या कडेला आदळला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

वाचा- ‘लव्ह जिहाद’चा कायदा करणार का? देवेंद्र फडणवीस थेट बोलले, याबाबत अद्याप आमचा निर्णय...


ट्रकचा ब्रेक फेल पुणे हद्दीत झाला तर तो रायगड हद्दीत एका डोंगराला आदळला. या घटनेची नोंद खालापूर पोलिसांकडून घेतली गेली आहे. तर चालक संजय यादव यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख