अ‍ॅपशहर

आज होणार तुमची सावली ‘गायब’

रखरखीत उन्हातली आपल्या प्रत्येकाची पक्की साथीदार म्हणजे आपली सावली. पण, ही सावलीच आज, अर्थात मंगळवारी (१४ मे) आपल्या सर्वांची साथ सोडून चक्क गायब होणार आहे. हो, निसर्गाची ही अजब किमया अनुभवायची असेल, तर दुपारी स्वतः उन्हात जाऊन बघा कारण मंगळवारचा दिवस हा 'झीरो शॅडो डे' अर्थात शून्य सावलीचा दिवस असणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स 14 May 2019, 5:10 am
म. टा. प्रतिनिधी, पुणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shadow

रखरखीत उन्हातली आपल्या प्रत्येकाची पक्की साथीदार म्हणजे आपली सावली. पण, ही सावलीच आज, अर्थात मंगळवारी (१४ मे) आपल्या सर्वांची साथ सोडून चक्क गायब होणार आहे. हो, निसर्गाची ही अजब किमया अनुभवायची असेल, तर दुपारी स्वतः उन्हात जाऊन बघा कारण मंगळवारचा दिवस हा 'झीरो शॅडो डे' अर्थात शून्य सावलीचा दिवस असणार आहे.

सावली गायब होण्याचा हा अनुभव घेण्यासाठी ज्योतिर्विद्या परिसंस्थेतर्फे टिळक स्मारक मंदिराच्या आवारात निरीक्षणाची संधी पुणेकरांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. दुपारी १२ वा. ३१ मिनिटांनी शून्य सावलीची वेळ असणार आहे. दुपारी १२ ते १ या वेळेत शून्य सावलीच्या अनुभवासोबत दुर्बिणीतून सौर डागांचे निरीक्षणही करता येणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार आहे. उत्तर गोलार्धातील कर्कवृत्त आणि दक्षिण गोलार्धातील मकरवृत्त यामधील प्रदेशातच सूर्य आकाशात बरोबर डोक्यावर आल्याने वर्षातून दोन वेळा शून्य सावलीचा अनुभव घेता येतो. १४ मे नंतर जुलैमध्ये पुन्हा शून्य सावलीचा दिवस असणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज