अ‍ॅपशहर

‘ड्रंक अँड ड्राइव्ह’मुळे वाहतूक कर्मचारी त्रस्त

येरवडा : सर्वोच्च न्यायालयाच्या राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील पाचशे मीटरच्या अंतरात असलेले देशी आणि विदेशी दारू दुकाने बंद करण्याचा आदेश दिल्याने शहर आणि जिल्ह्यातील बहुतांश दारू आणि बियरच्या दुकानांना टाळे लागले आहे. परिणामी दारू पिऊन वाहने चालविणाऱ्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. त्यामुळे ड्रंक आणि ड्राइव्हच्या गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. असे असतानाही ड्रंक अँड ड्राइव्हचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी वरिष्ठांकडून आग्रह होत आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत कारवाई होत आहे.वाहतूक कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहे. पुणे जिल्ह्यातील सोळाशेपेक्षा जास्त दारूची दुकाने आणि हॉटेल्स कायमची बंद झाली आहेत. परिणामी ड्रंक अँड ड्राइव्हच्या केसेसही कमी झाल्या आहेत. परिणामी वाहतूक विभागाचा दर महिन्यात गोळा होणारा महसूल कमी झाला आहे. ही तूट भरून काढण्यासाठी वाहतूक उपायुक्तांकडून रात्री उशिरापर्यंत थांबून ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई करण्याचा आग्रह वरिष्ठांकडून होत आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांना रात्री थांबावे लागत आहे, अशी माहिती काही वाहतूक कर्मचाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

Maharashtra Times 17 May 2017, 11:24 am
येरवडा : सर्वोच्च न्यायालयाच्या राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील पाचशे मीटरच्या अंतरात असलेले देशी आणि विदेशी दारू दुकाने बंद करण्याचा आदेश दिल्याने शहर आणि जिल्ह्यातील बहुतांश दारू आणि बियरच्या दुकानांना टाळे लागले आहे. परिणामी दारू पिऊन वाहने चालविणाऱ्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. त्यामुळे ड्रंक आणि ड्राइव्हच्या गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. असे असतानाही ड्रंक अँड ड्राइव्हचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी वरिष्ठांकडून आग्रह होत आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत कारवाई होत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम traffic workers suffer from drunk and drive
‘ड्रंक अँड ड्राइव्ह’मुळे वाहतूक कर्मचारी त्रस्त


वाहतूक कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहे. पुणे जिल्ह्यातील सोळाशेपेक्षा जास्त दारूची दुकाने आणि हॉटेल्स कायमची बंद झाली आहेत. परिणामी ड्रंक अँड ड्राइव्हच्या केसेसही कमी झाल्या आहेत. परिणामी वाहतूक विभागाचा दर महिन्यात गोळा होणारा महसूल कमी झाला आहे. ही तूट भरून काढण्यासाठी वाहतूक उपायुक्तांकडून रात्री उशिरापर्यंत थांबून ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई करण्याचा आग्रह वरिष्ठांकडून होत आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांना रात्री थांबावे लागत आहे, अशी माहिती काही वाहतूक कर्मचाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज