अ‍ॅपशहर

खडकी पोलिस ठाण्यात बारा पोलिसांना करोना

खडकी पोलिस ठाण्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. खडकी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस निरीक्षक (गुन्हे) यांच्यासह आठ कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Aug 2020, 9:55 am
म. टा. प्रतिनिधी, येरवडा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम police


खडकी पोलिस ठाण्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. खडकी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस निरीक्षक (गुन्हे) यांच्यासह आठ कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे. एकाच पोलिस ठाण्यातील दोन पोलिस निरीक्षकांना करोनाची लागण झाल्याने येरवडा पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्याकडे पदभार सोपविण्यात आला आहे. मंगळवारी आणखीन एक उपनिरीक्षक आणि कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने बाधितांची संख्या बारा झाली आहे.

पोलिस ठाण्यातील दोन पोलिस निरीक्षक आणि आठ कर्मचाऱ्यांना करोना झाल्याने त्यांच्यावर ठिकठिकाणी उपचार चालू आहेत. त्यामुळे येरवडा पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक (गुन्हे) अजय वाघमारे यांच्याकडे खडकी पोलिस ठाण्याचा तात्पुरता कार्यभार सोपविण्यात आला आहे. खडकी पोलिस ठाण्यातील आणखीन एका उपनिरीक्षक आणि कर्मचाऱ्याला मंगळवारी करोना झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे खडकी पोलिस ठाण्यातील करोनाबाधितांची संख्या बारा झाली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज