अ‍ॅपशहर

उद्योगनगरीत रंगभूमी दिन साजरा

म टा प्रतिनिधी, पिंपरीपिंपरी-चिंचवडमध्ये विविध संस्थांच्या वतीने रंगभूमी दिन उत्साहात साजरा करण्यात आला...

Maharashtra Times 10 Nov 2018, 4:00 am

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवडमध्ये विविध संस्थांच्या वतीने रंगभूमी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. चिंचवडमध्ये थिएटर वर्कशॉप कंपनीच्या 'पैस' रंगमंचावर विविध कलाविष्कारांनी हा दिन साजरा केला. निगडीच्या अथर्व थिएटर्सच्या वतीने रंगकर्मी डॉ. स्मिता कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.

संस्कार भारतीचे प्रांत उपाध्यक्ष प्रकाशराव जोशी, संस्कार भारती पिंपरी चिंचवडचे सचिव हर्षद कुलकर्णी, ज्येष्ठ रंगकर्मी आणि संस्कारभारती नाट्यविधा प्रमुख नरेंद्र आमले, ज्येष्ठ रंगकर्मी सुहास जोशी, किरण येवलेकर, मनोहर जुवाटकर, प्रभाकर पवार आदी या वेळी उपस्थित होते.

कार्यक्रमात विविध रंगकर्मींनी आपली कला सादर केली. नाट्यछटा, एकल नाट्य, नाट्य अभिवाचन, कविता सादरीकरण, एकपात्री असे विविध कलाप्रकार या वेळी सादर केले. कार्यक्रमात २५ ज्येष्ठ आणि नवोदित कलाकारांनी कला सादर करून रंगभूमी दिन उत्साहात साजरा केला. या वेळी 'रात्र १६ जानेवारीची' या नविन नाटकाचा मुहूर्त आणि संहिता पूजन करण्यात आले. समस्त कलाकार मंडळींचा मेळावा या वेळी संपन्न झाला.

०००००

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज