अ‍ॅपशहर

२५ वारकऱ्यांना घेऊन आळंदीला जाणारी पिकअप उलटली, पुण्यात मोठा अपघात

अपघातात जखमी झालेले नागरिक हे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील आहेत. या पिकअप गाडीतून बुधवारी दिवसभर २४ नागरिक हे देवदर्शनासाठी आले होते. दिवसभर पंढरपूर, जेजुरी येथील देवांचे दर्शन घेऊन पिकअप घेऊन देवाची आळंदी या ठिकाणी देव दर्शनासाठी निघाले होते.

| Edited byनुपूर उप्पल | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Oct 2022, 7:04 pm
पुणे: शिंदवणे घाटात वारकऱ्यांची पिकअप गाडी पलटी झाली आहे. या अपघातात १५ वारकरी जखमी झाले असून जखमींना उरुळी कांचन येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. हे वारकरी औरंगाबाद येथील असल्याची माहिती समोर येत असून जेजुरी येथील देवदर्शन करून उरुळी कांचनच्या दिशेने निघाले असता शिंदवणे घाटामध्ये तीव्र उतारावर गाडीला ब्रेक न लागल्याने अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास अपघात झाला आहे. या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत तर २० हून अधिक जण किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Pune News
२५ वारकऱ्यांना घेऊन आळंदीला जाणारी पिकअप उलटली, पुण्यात मोठा अपघात


मच्छिंद्र माधवराव दाभाडे (वय ६६) शामराव आसाराम देवकाते (वय ६८), भाऊसाहेब उमाजी साबळे (वय-६५ रा. तिघेही धामणगाव, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) अशी गंभीर जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत.

हेही वाचा -देवीची मूर्ती घेऊन भावंडं घरी निघाले, वाटेत मृत्यू वीज बनून कोसळला, बहिणीचा मृत्यू...

अपघातात जखमी झालेले नागरिक हे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील आहेत. या पिकअप गाडीतून बुधवारी दिवसभर २४ नागरिक हे देवदर्शनासाठी आले होते. दिवसभर पंढरपूर, जेजुरी येथील देवांचे दर्शन घेऊन पिकअप घेऊन देवाची आळंदी या ठिकाणी देव दर्शनासाठी निघाले होते. शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीतील घाटात आले असता उतारावरील वळणावरती चालकाचे पिकअप वरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे.

हेही वाचा -दोन महिन्यांवर लग्न आलेलं, वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी जवानाचा हार्ट अटॅकने मृत्यू

जखमींना उरुळी कांचन येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आली असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. यात एकूण २५ वारकरी असल्याची माहिती समोर येत असून त्यात तिघे गंभीर असल्याचे समजते आहे.

हेही वाचा -कधी करायचा पिझ्झा डिलिव्हरी; आज तब्बल ६,००० कोटींचा मालक, थक्क करणारा प्रवास

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज