अ‍ॅपशहर

‘एग्लार’ परिषदेला नावे बघून परवानगी

‘शनिवार वाडा येथे ३१ डिसेंबरला झालेल्या एग्लार परिषदेला उपस्थित रहाणाऱ्या मान्यवरांची नावे बघून काही अटींवर पुणे पोलिसांकडून कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली होती. त्यामध्ये ‘कबीर कला मंचा’चा कार्यक्रम होणार असल्याची आम्हाला माहिती नव्हती,’ असा दावा पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पत्रकार परिषदेत केला.

Maharashtra Times 13 Jan 2018, 3:00 am
पोलिस आयुक्त रश्मी शुक्लांची माहिती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम we dont know about kabir kala manch programme in elgar parishad in pune says police
‘एग्लार’ परिषदेला नावे बघून परवानगी

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘शनिवार वाडा येथे ३१ डिसेंबरला झालेल्या एग्लार परिषदेला उपस्थित रहाणाऱ्या मान्यवरांची नावे बघून काही अटींवर पुणे पोलिसांकडून कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली होती. त्यामध्ये ‘कबीर कला मंचा’चा कार्यक्रम होणार असल्याची आम्हाला माहिती नव्हती,’ असा दावा पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पत्रकार परिषदेत केला.
एग्लार परिषेदत प्रक्षोभक वक्तव्य केल्याच्या आरोपावरून आमदार जिग्नेश मेवाणी, जेएनयूतील विद्यार्थी नेता उमर खालिद आणि एग्लार परिषदेचे आयोजक, कबीर कला मंचाचे कलाकार यांच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत पोलिस आयुक्तांना विचारण्यात आले. त्या वेळी त्या म्हणाल्या, ‘माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, प्रकाश आंबेडकर, जिग्नेश मेवाणी यांची नावे बघून एग्लार परिषदेला परवानगी देण्यात आली होती. तसेच शनिवारवाड्यावर कार्यक्रम घेण्यासाठी महापालिकेकडून परवानगी मिळाली होती. त्यामुळे विश्रामबाग पोलिसांनीही त्यांना काही अटींवर परवानगी दिली होती. या कार्यक्रमाला कबीर कला मंचाचा कार्यक्रम होणार आहे, हे आम्हाला माहिती नव्हते. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.’

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज