अ‍ॅपशहर

गहू काळाबाजार करणारा अटकेत

रेशन दुकानाच्या गोदामातून ३९० गोणी गव्हाची विक्री करण्याच्या तयारीत असणाऱ्या ट्रक चालकास मुंढवा पोलिसांनी अटक केली आहे. अन्नधान्य पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केल्यानंतर मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेशनिंगचा गहू काळाबाजार करणाऱ्या मुख्य सूत्रधाराचा पोलिस शोध घेत आहेत.

Maharashtra Times 19 Nov 2017, 4:38 am
म. टा. प्रतिनिधी,हडपसर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम wheat black market arrested
गहू काळाबाजार करणारा अटकेत

रेशन दुकानाच्या गोदामातून ३९० गोणी गव्हाची विक्री करण्याच्या तयारीत असणाऱ्या ट्रक चालकास मुंढवा पोलिसांनी अटक केली आहे. अन्नधान्य पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केल्यानंतर मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेशनिंगचा गहू काळाबाजार करणाऱ्या मुख्य सूत्रधाराचा पोलिस शोध घेत आहेत.
या प्रकरणी ट्रकचालक नितीन आदिनाथ सोनवणे (वय ३३, रा. भीमनगर, मुंढवा) यास मुंढवा पोलिसांनी अटक केली आहे. पुरवठा विभागाच्या अधिकारी सुदेशा उत्तम कांबळे (वय ५२,रा. विद्यानागर,पिंपळे नगर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. घोरपडी येथील भारत फोर्ज रस्त्यावरील तरवडे पार्किंगच्या आतमध्ये गोदाम आहे. तेथे बुधवारी सकाळी आठ वाजता जमिनीवर गहू व तांदूळ सांडल्याचे आढळून आले. गोदामाची चौकशी केली असता ते स्वस्त धान्य दुकानदार घोरपडी यांचे असल्याचे नागरिकांनी सांगितले. ट्रकमध्ये गोदामातील रेशनिंगचा गहू तांदूळ ते भरण्यात आले होते. रेशनिंगचा गहू काळाबाजार करण्यासाठी घेऊन जात असल्याचा संशय आला. याबाबत तात्काळ पोलिसांना माहिती दिली. यावरून मुंढवा पोलिसांनी पाहणी केली असता, ट्रकमध्ये ३९० गोण्या आढळून आल्या. त्यामुळे पोलिसांनी सोनवणे याला ताब्यात घेतले. अन्नधान्य पुरवठा ' ड ' विभागाचे अधिकारी भोसले यांनी ट्रकमधील गव्हाची तपासणी केली. रेशनिंगच्या गव्हाचा काळाबाजार करणाऱ्या मुख्य सूत्रधाराचा शोध पोलिस घेत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज