अ‍ॅपशहर

घाऊक बाजारात कांदा अखेर स्वस्त

दिवसेंदिवस होणाऱ्या दरवाढीने सर्वसामान्यांना रडवणाऱ्या कांद्याच्या घाऊक बाजारातील दरात रविवारी किलोमागे २० ते ४० रुपयांची घट झाली. मात्र, तरीही किरकोळ बाजारात कांद्याचे भाव अद्यापही तेजीत आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा केव्हा मिळणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र टाइम्स 9 Dec 2019, 10:28 am
म. टा. प्रतिनिधी, पुणे: दिवसेंदिवस होणाऱ्या दरवाढीने सर्वसामान्यांना रडवणाऱ्या कांद्याच्या घाऊक बाजारातील दरात रविवारी किलोमागे २० ते ४० रुपयांची घट झाली. मात्र, तरीही किरकोळ बाजारात कांद्याचे भाव अद्यापही तेजीत आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा केव्हा मिळणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम onion


अतिवृष्टीचा फटका आणि जुन्या कांद्याचा अंतिम टप्प्यात असलेला साठा यामुळे कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मात्र, गेल्या चार दिवसांपासून पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केâट यार्डात कांद्याची आवक वाढली आहे. त्यामुळे कांद्याच्या भावात घाऊक बाजारात दहा किलोमागे २०० ते ४०० रुपयांची घसरण झाली. कांद्याला प्रतवारीनुसार किलोला ६० ते १३० रुपये भाव मिळला.

रविवारी (ता. ८) मार्केट यार्डात गुजरातहून १०० टन नवीन कांद्याची आवक झाली; तर पुणे विभागातून ९० ते १०० ट्रक नवीन कांदा आणि १० ते १२ ट्रक जुना कांदा बाजारपेठेत दाखल झाला. नव्या कांद्याला दहा किलोस दर्जानुसार ६०० ते १००० रुपये; तर जुन्या कांद्याला १००० ते १३०० रुपये भाव मिळाला. येत्या काळात कांद्याची आवकेनुसार कांद्याच्या भावात चढ-उतार होईल. मात्र, कांद्याचे दर पूर्वपदावर येण्यासाठी फेâब्रुवारी किंâवा मार्च महिन्याची प्रतीक्षा करावी लागेल, असे व्यापारी सांगत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज