अ‍ॅपशहर

‘आधार’सक्ती असल्यास ओळखपत्रे कशाला?

‘प्रत्येक ठिकाणी ओळखीच्या पुराव्यासाठी आधार कार्ड जोडणे सक्तीचे होणार असेल, तर मतदान ओळखपत्र, पासपोर्ट अशा इतर ओळखपत्रांची गरजच काय,’ असा प्रश्न मद्रास उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील अॅड. अरविंद दातार यांनी शनिवारी उपस्थित केला.

Maharashtra Times 27 Nov 2017, 3:00 am
अॅड. अरविंद दातार यांचा सवाल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम why other identity cards if aadhar is coumpulsary says aravind datar
‘आधार’सक्ती असल्यास ओळखपत्रे कशाला?


म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘प्रत्येक ठिकाणी ओळखीच्या पुराव्यासाठी आधार कार्ड जोडणे सक्तीचे होणार असेल, तर मतदान ओळखपत्र, पासपोर्ट अशा इतर ओळखपत्रांची गरजच काय,’ असा प्रश्न मद्रास उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील अॅड. अरविंद दातार यांनी शनिवारी उपस्थित केला. ‘सरकारी माहितीनुसार देशातील एकूण पॅन कार्डपैकी ०.४ टक्केच पॅन कार्ड बोगस आहेत. मग इतर ९९.६ टक्के नागरिकांवर पॅन कार्डला आधार जोडण्याची सक्ती कशासाठी,’ असा मुद्दाही त्यांनी या वेळी मांडला.

‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’तर्फे (पीआयसी) ‘गोपनीयतेचा अधिकार-भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य’ या विषयावर दातार यांचे व्याख्यान शनिवारी आयोजित करण्यात आले होते. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ शास्त्रज्ज्ञ व पीआयसीचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर, प्रा. अमिताव मलिक, मानद संचालक प्रशांत गिरबने या वेळी उपस्थित होते. ‘सरकारच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत अचूकपणे पोहोचण्यास मदत व्हावी हा आधार कायद्याचा मूळ उद्देश आहे. या कायद्याच्या कलम ३ व ७ नुसार आधार कार्ड ऐच्छिक आहे. आता मात्र, पॅन कार्ड आणि बँक खात्यासह म्युच्युअल फंडासारख्या गोष्टींसाठीही आधार सक्ती केली जाते,’ असे अॅड. दातार म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज