अ‍ॅपशहर

पुण्यात पत्नीची हत्या, यूपीत सासऱ्याचा खून

पिंपरीतील एमआयडीसी कारखान्यात एका इसमानं आपल्या पत्नीची हत्या करून, तिचा मृतदेह भोसरीतील एका नाल्यात फेकल्यानंतर थेट उत्तर प्रदेशात जाऊन सासऱ्याचाही खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या आरोपीला पिंपरी पोलिसांनी सापळा रचून उत्तर प्रदेशातून अटक केली आहे.

Maharashtra Times 19 Oct 2017, 3:51 pm
मटा ऑनलाइन वृत्त | पिंपरी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम wife killed in pune by her husbandkills father in law too
पुण्यात पत्नीची हत्या, यूपीत सासऱ्याचा खून


पिंपरीतील एमआयडीसी कारखान्यात एका इसमानं आपल्या पत्नीची हत्या करून, तिचा मृतदेह भोसरीतील एका नाल्यात फेकल्यानंतर थेट उत्तर प्रदेशात जाऊन सासऱ्याचाही खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या आरोपीला पिंपरी पोलिसांनी सापळा रचून उत्तर प्रदेशातून अटक केली आहे.

पुण्यात १५ दिवसांपूर्वी भोसरीतील एका नाल्यामध्ये महिलेचा मृतदेह पोत्यात बांधून टाकल्याचे आढळले होते. पाच दिवसांपूर्वी या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली आणि तिच्या पतीनेच हा खून केल्याचं समोर आलं. घरातील सतत होणाऱ्या भांडणांना कंटाळून पतीने या महिलेच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून तिचा खून केला होता. पत्नीचा मृतदेह पोत्यात भरून तो त्यानं भावाच्या मदतीने भोसरीतील नाल्यात टाकला होता. पत्नीच्या हत्येनंतर आपल्या ४ वर्षांच्या मुलाला घेऊन हा इसम उत्तर प्रदेशला रवाना झाला होता. मुलाला बहिणीकडे सोपवून त्याने थेट बायकोचं माहेर गाठलं होतं आणि सासऱ्याचाही खून केला होता.

महिलेच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पिंपरी पोलिसांनी कसून तपासाला सुरू केला होता. तेव्हा, या महिलेचा पती उत्तर प्रदेशात गेल्याची माहिती त्यांना मिळाली. तिथेच त्यांचा संशय बळावला. पिंपरी पोलिसांचं एक पथक विमानाने, दुसरे रेल्वेने तर तिसरे पथक गाडीने त्याच्या मागावर गेलं आणि त्यांनी आरोपीला अटक केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज