अ‍ॅपशहर

मुख्याध्यापिकेला ओसाडेत शिवीगाळ

वेल्हे तालुक्यातील ओसाडे गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिकेस शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी सरपंच उल्हास चंद्रकांत कोकाटे (वय ४०) यांच्यावर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

Maharashtra Times 11 Jul 2016, 3:00 am
भोर : वेल्हे तालुक्यातील ओसाडे गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिकेस शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी सरपंच उल्हास चंद्रकांत कोकाटे (वय ४०) यांच्यावर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम woman headmaster verbal abuse in velhe
मुख्याध्यापिकेला ओसाडेत शिवीगाळ


कोकाटे यांनी शाळेच्या व्यवस्थापन समितीत स्वतःच्या मर्जीतील लोकांची नावे टाकण्यास भाग पाडले, शाळेची एक खोली ग्रामपंचायत कार्यालयासाठी घेतली, शाळेचे रंगकाम आणि इतर कामांसाठी पैशाची मागणी केली, कोणतीही परवानगी न घेता शाळेच्या आवारातील खोली पाडून तेथे अंगणवाडी इमारत बांधण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकारास विरोध केल्याने कोकाटे यांनी शिवीगाळ केल्याचे मुख्याध्यापिकेने तक्रारीत म्हटले आहे. ‘शाळेत का आलीस, सांगेल तशी कामे करायची, शाळेत दिसलीस तर बघ,’ अशी भाषा वापरून दमदाटी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मुख्याध्यापिकेने पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे ही तक्रार केली होती. मुख्याध्यापिका काही दिवसांपासून रजेवर आहेत. त्यामुळे त्यांची वार्षिक वेतनवाढ काढण्यात आलेली नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज