अ‍ॅपशहर

...म्हणून 'तिनं' जावेच्या मुलाला मारले!

आपल्या घरात मुलीच आहेत, मुलगा नाही. मात्र शेजारी राहणाऱ्या लहान जावेला मुलगा आहे. यामुळे कायम टोचून बोलले जाते, याचा राग मनात ठेवून ५ वर्षाच्या सख्या पुतण्याचा खून करून पाण्याच्या ड्रममध्ये मृतदेह लपवणाऱ्या नराधम महिलेला अटक करण्यात आली.

Maharashtra Times 24 Mar 2017, 10:10 am
मटा ऑनलाइन वृत्त । पुणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम woman in pune killed nephew
...म्हणून 'तिनं' जावेच्या मुलाला मारले!


आपल्याला मुलीच आहेत; मुलगा नाही. शेजारी राहणाऱ्या लहान जावेला मात्र मुलगा आहे. यामुळं कायम टोचून बोललं जातं, याचा राग मनात ठेवून एका महिलेनं ५ वर्षांच्या सख्ख्या पुतण्याचा खून केल्याची घटना पुण्यातील हडपसर येथे घडली आहे. पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे.

हडपसर येथील काळेपडळ ससाणेनगर परिसरातून काल सकाळी माऊली विनोद खांडेकर हा ५ वर्षांचा मुलगा बेपत्ता झाला. कुटुंबीयांनी व नातेवाईकांनी बराच वेळ शोध घेतला. मात्र, तो न सापडल्यानं हडपसर पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत हे धक्कादायक हत्याकांड उघड झाले.

माऊलीचा त्याच्या काकूनेच गळा आवळून खून केला होता. मारल्यानंतर त्याचा मृतदेह काहीकाळ घरामध्येच खाटेखाली लपवला. घरातील मंडळी व पोलीस मुलाच्या शोधात घराबाहेर पडल्यानंतर तिनं पुतण्याचा मृतदेह घरामागच्या पाण्याच्या ड्रममध्ये टाकला. कोणताही पुरावा मागे न ठेवता थंड डोक्यानं निर्घृण खून करून संबंधित महिला पुतण्या हरवल्याचा दु:खात खोटे अश्रू गाळत होती. पोलिसांना तिच्यावर संशय आल्यानंतर त्यांनी चौकशी केली असता तिनं गुन्ह्याची कबुली दिली. खून झाल्यानंतर २४ तासांच्या आत पोलिसांनी तिला अटक केली.

हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार, निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी हेमंत पाटील व संदीप देशमाने यांनी हे तपास काम पहिले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज