अ‍ॅपशहर

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणीची आत्महत्या

बारामतीमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

Maharashtra Times 22 Jul 2017, 3:00 am
‘सीआरपीएफ’ कमांडोसह आठ जणांवर गुन्हा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम young girl committed suicide in baramati
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणीची आत्महत्या


म. टा. प्रतिनिधी, बारामती
बारामतीमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. कीर्ती शेरे (वय २५) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. या प्रकरणी सीआरपीएफ कमांडोसह आठ जणांवर फसवणूक करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल बारामती शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आठ जणांनी आपली फसवणूक केल्याचा आरोप या विद्यार्थिनीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात केला आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून आठ जण आपल्याला ब्लॅकमेल करत होते, तसेच शारीरिक संबंध ठेवण्यासाठी धमकी देत असल्याचे तरुणीने पत्रात म्हटले आहे. ‘सीआरपीएफ’ कमांडो गणेश राऊतसह सर्वांना शिक्षा देऊन मला न्याय द्यावा, अशी मागणी किर्तीने पत्रात केली आहे. माझ्या आत्महत्येप्रकरणी घरच्यांना जबाबदार धरू नये असेही तिने पत्रात लिहिले आहे. या प्रकरणाची चौकशी सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड करत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज