अ‍ॅपशहर

UPमध्ये कर्जमाफी मग महाराष्ट्रावर अन्याय का?

उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यानाथ यांनी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केल्यानंतर महाराष्ट्रातही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी जोर धरू लागली आहे. ' महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची परिस्थिती उत्तर प्रदेशपेक्षा गंभीर असतानाही राज्य सरकार शेतक-यांना कर्जमाफी देत नाही. हा महाराष्ट्रातील शेतक-यांवर अन्याय आहे', अशी संतप्त प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

Maharashtra Times 4 Apr 2017, 8:52 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम radhakrishna vikhe patil demands loan waiver in maharashtra
UPमध्ये कर्जमाफी मग महाराष्ट्रावर अन्याय का?

उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यानाथ यांनी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केल्यानंतर महाराष्ट्रातही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी जोर धरू लागली आहे. ' महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची परिस्थिती उत्तर प्रदेशपेक्षा गंभीर असतानाही राज्य सरकार शेतक-यांना कर्जमाफी देत नाही. हा महाराष्ट्रातील शेतक-यांवर अन्याय आहे', अशी संतप्त प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

' गेल्या अडीच वर्षांत नऊ हजार शेतक-यांच्या आत्महत्यांचा दुर्दैवी उच्चांक झाला आहे. राज्यातील शेतकरी सरकारच्या नावे पत्र लिहून आत्महत्या करत आहेत, असंख्य शेतक-यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रामध्ये सरकारने कर्जमाफी करावी, अशी अंतिम इच्छा व्यक्त केली. मात्र तरीही हे सरकार शेतकरी कर्जमाफी करत नाही' अशा शब्दांत विखे-पाटील यांनी सरकारवर टीका केली.

भाजपचे केंद्र सरकार महाराष्ट्राच्या कर्जमाफीसाठी मदत करण्याची ठोस भूमिका घेत नाही. या परिस्थितीत उत्तर प्रदेशातील शेतक-यांना जाहीर झालेली कर्जमाफी म्हणजे महाराष्ट्रातील शेतक-यांच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखे आहे. या दुजाभावाविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज