अ‍ॅपशहर

विनायक मेटे यांच्या गाडीला भीषण अपघात; प्रकृती गंभीर असल्याची माहिती

Vinayak Mete Accident News : रुग्णालय प्रशासनाकडून अद्याप विनायक मेटे यांच्या प्रकृतीविषयी अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र अपघाताचं स्वरुप भीषण असल्याने मेटे यांना गंभीर इजा झाली आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Aug 2022, 7:45 am
रायगड : शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. या अपघातात मेटे यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर सध्या पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम vinayak mete accident news
विनायक मेटे अपघात


मिळालेल्या माहितीनुसार, विनायक मेटे हे आपल्या चालक आणि सुरक्षारक्षकासह बीडहून मुंबईकडे येत होते. मात्र खालापूर टोलनाक्याजवळ गाडी बोगद्यात जाताच भीषण अपघात झाला. पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर मेटे यांना तातडीने रुग्णालयात पोहोचवण्यात अडचणी आल्या. अखेर काही वेळानंतर त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालय प्रशासनाकडून अद्याप मेटे यांच्या प्रकृतीविषयी अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र अपघाताचं स्वरुप भीषण असल्याने मेटे यांना हाताला आणि डोक्याला गंभीर इजा झाल्याचं सांगण्यात येत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज