अ‍ॅपशहर

छत्रपती शिवरायांनी आखून दिलेल्या मार्गावर वाटचाल केल्यास २१व्या शतकातही प्रतिस्वराज्य साकारता येईल- राष्ट्रपती

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी किल्ले रायगडला भेट दिली. यावेळी त्यांनी शिवप्रभूंच्या समाधीचे दर्शन घेतले. राष्ट्रपतींनी शिवछत्रपतींच्या अष्टप्रधान मंडळाच्या कार्यपद्धतीबद्दल आणि देशातील पहिल्या नौदलाच्या स्थापनेबद्दल राष्ट्रपतींनी कौतुकोद्गार काढले.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Dec 2021, 6:08 pm
रायगड: छत्रपती शिवाजी महाराजांनी आखून दिलेल्या वाटेने मार्गक्रमण केल्यास एकविसाव्या शतकातही प्रति स्वराज्याची स्थापना करता येईल, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांनी सोमवारी किल्ले रायगडाला (Raigad Fort) भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खा. छत्रपती संभाजी राजे यांनी रायगडावर झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपतींना दांडपट्टा, भवानी तलवार, आज्ञापत्राची प्रत आणि शिवकालीन होनाची प्रतीकृती भेट दिली. राष्ट्रपती महोदयांनी प्रथम होळीच्या माळावरील शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तर दौऱ्याच्या शेवटी शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेतले. राजसदर येथे छोटेखान कार्यक्रमात राष्ट्रपती महोदयांचा आदर सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रपतींनी शिवछत्रपतींच्या अष्टप्रधान मंडळाच्या कार्यपद्धतीबद्दल आणि देशातील पहिल्या नौदलाच्या स्थापनेबद्दल राष्ट्रपतींनी कौतुकोद्गार काढले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम President Ramnath Kovind
राजसदर येथे छोटेखान कार्यक्रमात राष्ट्रपती महोदयांचा आदर सत्कार करण्यात आला.


गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा रायगड दौरा अनेक कारणांमुळे चर्चेत होता. नियोजित कार्यक्रमानुसार सुरुवातीला राष्ट्रपती हेलिकॉप्टरने किल्ले रायगडावर जाणार होते. मात्र, शिवप्रेमींनी रायगड किल्ल्यावर हेलिपॅड उभारण्यास विरोध केला होता. त्यामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रोप वेचा वापर करावा, अशी विनंती करण्यात आली होती. अखेर शिवप्रेमींच्या विनंतीला मान देत राष्ट्रपतींनी रोप वेच्या साहाय्याने किल्ल्यावर येणे मान्य केले होते. त्यानुसार दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास राष्ट्रपती रामनाथ कोविंद रायगड परिसरात आले. यानंतर त्यांचा दौरा नियोजनानुसार पार पडला.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद रायगड किल्ल्यावर येणार; कडेकोट पहारा, १ हजारांहून अधिक पोलीस तैनात

राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे रायगडकडे जाणाऱ्या महाड व माणगाव तालुक्याच्या प्रवेश रस्त्यांपासून पाचाड परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी असे एक हजारांहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले होते. दंगल नियत्रंण पथक, स्पेशल कमांडो, राष्ट्रपती सुरक्षा कमांडो, केंद्रीय यंत्रणांचे अधिकारी रायगड परिसरात तैनात होते.

महत्वाचे लेख