अ‍ॅपशहर

गणेश विसर्जनाला गालबोट; रत्नागिरीत दोघे बुडाले

पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून दोघांचाही शोध घेण्यात येत आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Aug 2020, 11:57 pm
रत्नागिरीः रविवारी दीड दिवसाच्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. करोनाच्या संकटामुळं यंदा घरच्या घरीच विसर्जन करण्याचा किंवा कृत्रिम तलावात बाप्पाचे विसर्जन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. मात्र, रत्नागिरीत समुद्रकिनारी विसर्जनासाठी गेलेल्या दोघे बुडाले असल्याची घटना घडली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम drown


रविवारी संध्याकाळी बाप्पाच्या विसर्जनासाठी रत्नागिरी शहरानजिक भाट्या टाकले येथे विशाल पिलणकर (३३) व सत्यवान पिलणकर (३०) असे दोघे गेले होते. मात्र, समुद्राचा अंदाज न आल्यानं दोघं बुडाल्याचं सांगण्यात येतंय. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून दोघांचाही शोध घेण्यात येत आहे. तसंच, डीवायएसपी गणेश इंगळे घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सोशल डिस्टनसिंग पाळून राज्यात दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप

दरम्यान, लाडक्या बाप्पांना आज दीड दिवस पूर्ण होताच भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. करोना साथीचे संकट असल्यामुळं यंदा गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजण पडले आहे. त्यामुळं सोशल डिस्टनसिंग आणि शांततेत गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मुंबई माहापालिकासह इतर महापालिकांनीही नियमांचे उल्लंघन होऊ नये म्हणून कृत्रिम तलावांची सोय करण्यात आली आहे.

वाचाः घरच्या घरीच दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज