दापोली: दापोली-खेड मार्गावरील कुंभवे गावाजवळ डंपर आणि मॅक्झिमोचा भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जण ठार झाले असून काहीजण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मॅक्झिमो गाडीतून काही प्रवासी दापोलीहून खेडकडे येत होते. त्यावेळी एका गाडीला ओव्हरटेक करताना मॅक्झिमो आणि डंपरची धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की मॅक्झिमो गाडीच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. मृतांमध्ये दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातातील मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाही. महामार्गावरील नारपोली गावाजवळील वळणावर हा भीषण अपघात झाला.
दापोली-खेड मार्गावरील भीषण अपघातात ५ ठार
दापोली-खेड मार्गावरील कुंभवे गावाजवळ डंपर आणि मॅक्झिमोचा भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जण ठार झाले असून काहीजण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Dec 2018, 11:14 am
हायलाइट्स:
- दापोली-खेड मार्गावरील कुंभवे गावाजवळ डंपर आणि मॅक्झिमोचा भीषण अपघात
- या अपघातात पाच जण ठार; मृतांमध्ये दोन महिला
- नारपोली गावाजवळील वळणावर हा भीषण अपघात