अ‍ॅपशहर

पुण्याहून कोकण फिरण्यासाठी गेलेल्या तरुणासोबत घडलं भयंकर, मित्रांच्या डोळ्यांदेखत झाला गायब...

Pune Konkan News Today : कोकणात पुण्यासाठी फिरण्यासाठी आलेल्या युवा पर्यटकांसोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस एका युवकाचा शोध घेत असल्याची माहिती आहे.

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Oct 2022, 7:14 am
रत्नागिरी : कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी समुद्र हा नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. पण समुद्रात जाताना आवश्यक ती काळजी स्थानिकांच्या सूचना लक्षात घेणे आवश्यक असते. समुद्रात पोहायला जाताना अतिउत्साहाच्या भरात आवश्यक खबरदारी काळजी न घेतल्यास जिवावर बेतू शकते. अशा अनेक घटना कोकणात दुर्दैवाने दरवर्षी घडत असतात. असाच एक धक्कादायक प्रकार रत्नागिरी गावखडी समुद्रात रविवारी घडला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ratnagiri news today marathi


पाण्याचा अंदाज न आल्याने पुण्यातील एक २८ वर्षीय तरूण पर्यटक बुडाला आहे. आकाश पांडुरंग सुतार असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. पुण्याहून पावस परिसरात फिरण्यासाठी आलेल्या चार मित्रांपैकी एकजण रविवारी सकाळी ११.३० वा. गावखडी समुद्रात बुडाला. त्याचा शोध घेण्यात येत आहे. पुणे येथून प्रशांत जालिंदर काळे, आकाश पांडुरंग सुतार, राजकुमार शेषराव पिटले, कृष्णा ज्ञानोबा येडीलवाड हे चौघे मित्र सुट्टी असल्याने फिरण्यासाठी आले होते.

रविवारी सकाळी ११ वा. गावखडी समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेले होते. समुद्रकिनाऱ्यावर फिरताना आकाश सुतार हा समुद्रात पोहण्यासाठी गेला. त्यावेळी त्याच्याबरोबर असलेले तिघेजण पोहता येत नसल्याने समुद्रकिनारी बसून राहिले होते. पाण्याचा जोर वाढल्याने आकाश गटांगळ्या खाऊन बुडत असल्याचे त्याच्या मित्रांच्या लक्षात आले. यावेळी राजकुमार पिटले याने समुद्राच्या पाण्यात उतरण्याचा प्रयत्न केला, धावपळ केली पण आकाश दिसून आला नाही. त्यामुळे त्यांनी तातडीने धाव घेत जवळच असलेल्या एका दुकानदाराला माहिती दिली व त्यांच्या मदतीने पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्यात आला.

पोलिसांनी तात्काळ या घटनेची दखल घेतली पण रात्री उशिरापर्यंत बेपत आकाश कोठेही सापडलेला नाही. तर सध्या त्याचा शोध सुरू असून यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख