रत्नागिरी: भाजपकडून उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा हा खऱ्या अर्थाने विकासाचे सोने लुटणारा मेळावा असेल. तर उद्धव ठाकरे यांचा मेळावा हसरा मेळावा असून यात टीका टोमणे, शिव्याशाप याशिवाय कोणत्याही विचारांचे सोने लुटले जाणार नाही. कारण आता यांचे विचार सोन्याचे होण्याऐवजी सोनियांचे झाले आहेत. हे सोनिया गांधींच्या विचारांची मंडळी झाले आहेत. त्यामुळे आता विचारांचे सोने लुटण्याच्या मनस्थितीत नाहीत हे शिवसैनिक देखील समजून चुकले आहेत, अशी घणाघाती टीका भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी लांजा येथे केली. (BJP criticizes uddhav thackeray) माजी आमदार आणि भाजपचे नेते प्रमोद जठार हे सोमवारी ३ ऑक्टोबर रोजी लांजा येथे आले होते. यावेळी त्यांनी दसरा मेळाव्यावरून उद्धव ठाकरे यांना लक्ष केले. ते म्हणाले की बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री शिंदे यांचा होणारा मेळावा हा खऱ्या अर्थाने विकासाचे सोने लुटणारा, शिवरायांचे, बाळासाहेबांचे विचार लुटणारा मेळावा असेल. तर उद्धव ठाकरे यांचा होणारा मेळावा हा मेळावा हसरा मेळावा आहे. या मेळाव्यात टीकाटिप्पणी, शिव्याशाप या व्यतिरिक्त कोणत्याही विचारांचे सोने लुटले जाणार नाही.
आमदार राजन साळवी यांच्यावर टीका करताना प्रमोद जठार म्हणाले की, येथील आमदार राजन साळवी हे तळ्यात-मळ्यात आहेत. कुठे जावे कोणता झेंडा हाती घेऊ अशी अवस्था आमदार राजन साळवींची झाली आहे .सत्येत पण जायचे आहे आणि आमदारकी पण टिकवायची आहे. धरलं तर चावतंय आणि सोडले तर पळते अशी अवस्था त्यांची झाली आहे. रिफायनरी प्रकल्प धरावा तर चावतय आणि सोडलं तर प्रकल्प पण जातोय आणि आमदारकी पण जाते अशा शब्दात शेवटी माजी आमदार प्रमोद जठार यांनी आमदार राजन साळवी यांच्यावर टीका केली.
यावेळी भाजपचे लांजा तालुकाध्यक्ष महेश खामकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते