अ‍ॅपशहर

गोळीबारात अधिकारी, कॉन्स्टेबल ठार

दाभोळ येथील ‘आरजीपीएल’ या वीज कंपनीत तैनात असलेला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा (सीआयएसएफ) जवान हरीश कुमार गौंड याने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ‘सीआयएसएफ’चे सहाय्यक उपनिरीक्षक बाळू गणपत शिंदे आणि कॉन्स्टेबल रमिस पी. आर. यांचा मृत्यू झाला.

Maharashtra Times 3 Mar 2016, 2:13 am
गुहागर : दाभोळ येथील ‘आरजीपीएल’ या वीज कंपनीत तैनात असलेला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा (सीआयएसएफ) जवान हरीश कुमार गौंड याने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ‘सीआयएसएफ’चे सहाय्यक उपनिरीक्षक बाळू गणपत शिंदे आणि कॉन्स्टेबल रमिस पी. आर. यांचा मृत्यू झाला. त्यानंतर हरीशने पत्नीवरही गोळीबार करून स्वतःवरही गोळ्या झाडल्या. यात हे दोघेही जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cisf trooper kills two colleagues
गोळीबारात अधिकारी, कॉन्स्टेबल ठार


मंगळवारी रात्री ड्युटी संपल्यानंतर बाळू शिंदे, रमिस आणि हरीश हे तिघे आपल्याजवळील रायफल आणि गोळ्या जमा करण्यासाठी जात असताना, त्यांच्यात ड्युटीवरून वाद झाला. या रागाच्या भरात हरिशने शिंदे आणि रमिस यांना गोळ्या घालून ठार केले. तर यानंतर हरीशने पत्नी प्रियांका गौंड हिच्यावरही गोळीबार केला आणि नंतर स्वतःवरही गोळ्या झाडल्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज