अ‍ॅपशहर

कोकणातील हे आमदार उद्धव ठाकरेंसोबत; पण तीन आमदार नॉट रिचेबल

विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेतील बडे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकवल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदेसोबत शिवसेनेचे अनेक नाराज आमदार असल्याचा दावा केला जात आहे. आता कोकणातील काही आमदारही त्यांच्यासोबत असल्याचं बोललं जात आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byसचिन फुलपगारे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Jun 2022, 5:04 pm
प्रसाद रानडे, रत्नागिरी : कोकणातील रायगड जिल्ह्यातील तीन आमदार एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेल्याची चर्चा आहे. तरी रत्नागिरी जिल्ह्यातील आमदार वर्षा बंगल्यावर झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम eknath shinde news shiv sena mlas from raigad district not reachable
कोकणातील हे आमदार उद्धव ठाकरेंसोबत; पण तीन आमदार नॉट रिचेबल


गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव हे रात्रीच मतदारसंघात दाखल झाले आहेत. पूर्वनियोजित असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकिसाठी ते चिपळूण येथे उपस्थित आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर मतदारसंघाचे शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार राजन साळवी, रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे मंत्री उदय सामंत आणि दापोली खेड मंडणगड मतदारसंघाचे आमदार योगेश कदम हे तीनही आमदार मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला उपस्थित होते.

रत्नागिरी जिल्ह्यातील या तिन्ही आमदारांबद्दल उलट सुलट चर्चा विरोधकांकडून सुरू झाल्या होत्या. मात्र हे आमदार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे खात्रीपूर्वक माहिती सूत्रांनी दिली आहे.

LIVE बाळासाहेबांचे कट्टर सैनिक, आम्हाला दिघेंची शिकवण, सत्तेसाठी प्रतारणा करणार नाही : एकनाथ शिंदे

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे सूरतमध्ये आहेत. त्यांच्यासोबत १८ आमदार असल्याचे सांगण्यात येत आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातही चर्चा सुरू झाल्या होत्या. एकनाथ शिंदे यांच्यासोबत रायगड जिल्ह्यातील तीन आमदार असल्याचे बोलले जात आहे. ते नॉट रिचेबल आहेत. रायगड जिल्ह्यातील अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि महाडचे आमदार भरत गोगावले या तिघांचेही फोन लागत नसल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

सेना आमदारांनी बॅगा काढल्या, मतमोजणी लांबली अन् शिंदेंनी मुंबई सोडली; वाचा इनसाईड स्टोरी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज