अ‍ॅपशहर

कोकण रेल्वेचे कोट्यवधी खर्च वाचणार; 'या' कारणामुळे आता रेल्वेही घेणार वेग

एका महत्त्वाच्या कामगिरीमूळे एक अत्यंत महत्वाचा टप्पा कोकण रेल्वेने पूर्ण केला असून त्यामुळे मोठी आर्थिक बचतही होणार आहे. यासाठी रत्नागिरी, मडगाव तसेच उडूपी येथे इलेक्ट्रीक क्शनेवरील रेल्वे गाड्यांना रिमोटद्वारे हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Jun 2022, 4:57 pm
रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या मार्गाचे शंभर टक्के विद्युतीकरणाचे काम मार्च महिन्यात पूर्ण झालं आहे. रोहा ते ठोकूर दरम्यानच्या ७४० किलोमीटर लांबीच्या विद्युतीकरण झालेल्या कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचा राष्ट्रार्पण सोहळा दि. २० जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी २ वा. ४५ मिनिटांनी दृकश्राव्य माध्यमातून (व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे)आयोजित करण्यात आला आहे. या कामगिरीमूळे एक अत्यंत महत्वाचा टप्पा कोकण रेल्वेने पूर्ण केला असून त्यामुळे मोठी आर्थिक बचतही होणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम konkan railway electrification update


राष्ट्रार्पण सोहळ्यानंतर कोकण रेल्वेचा संपूर्ण मार्ग प्रदूषणमक्त वाहतुकीसाठी खुला होणार आहे. यासाठी रत्नागिरी, मडगाव तसेच उडूपी येथे इलेक्ट्रीक क्शनेवरील रेल्वे गाड्यांना रिमोटद्वारे हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. २४ मार्च रोजी या मार्गाची रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांच्याकडून तपासणी करण्यात आली होती. त्या पाठोपाठ आता २० जूनपासून ‘कोरे’चा संपूर्ण विद्युतीकृत मार्ग राष्ट्राला समर्पित केला जात असून कोकण रेल्वेसाठी हे एक नवं पर्व सुरु होत असल्याचे मानले जात आहे.

कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा रस्ता वाहतूकीसाठी बंद, पर्यटकांची होणार गैरसोय
या संदर्भात कोकण रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरु येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या कार्यक्रमाला उपस्थित राहून झेंडा दाखवत विद्युतीकरण झालेल्या मार्गाचा शुभारंभ करणार आहेत. कोकण रेल्वेच्या मार्गावर रत्नागिरी, मडगाव आणि उडूपी या तीन ठिकाणी या निमित्ताने विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

कोकण रेल्वेने विद्युतीकरण आणि मार्ग दुपदरीकरणाच्या कामाचा वेग कायम ठेवत काम पूर्ण केले आहे. यासाठी खुद्द पंतप्रधान मोदी तसेच रेल्वे मंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांनी देखील कोकण रेल्वेच्या कामगिरीची प्रशंसा केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी खुद्द पंतप्रधान मोदी यांच्याच हस्ते विद्युतीकरण झालेल्या प्रकल्पाचे राष्ट्राला समर्पण केले जात आहे.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज