अ‍ॅपशहर

'शरद पवार आणि काँग्रेस नको म्हणून ५० आमदारांनी मूळ घर सोडलं'

Maharashtra Politics News: एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता आहे. याचाच फायदा घेत आता भाजपकडून सरकारवर टीका करण्यात येत आहे.

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Jun 2022, 1:06 pm
रत्नागिरी : राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतरही शिंदे यांच्या समर्थनात वाढ झाली आहे. तळकोकणातले आमदार दीपक केसरकरही एकनाथ शिंदे यांच्या गोटात सहभागी झालेत. या सगळ्या मोठ्या राजकिय घडामोडींवर भाजपचे प्रदेश सरचिटणीस रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार निलेश राणे यांनी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष खा.शरद पवार व काँगेसवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sharad pawar


आमदार मूळ घर सोडून गेले ते काँग्रेस व पवार साहेब नको. पन्नास वर्षांच्या राजकारणात त्यांनी हेच कमावले अशी बोचरी टीका निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केली आहे. त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहलं की, '५० आमदार / मंत्री मूळ घर सोडून वेगळे झाले कारण त्यांना काँग्रेस आणि पवार साहेब नको. ५० वर्षाच्या राजकारणात पवार साहेबांनी हेच कमवलं'



Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या गटातील आमदाराचा मोठा खुलासा, फोनवरून सांगितली 'INSIDE STORY'
शिवसेना नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. शिंदे यांच्या बंडाला ४८ तास उलटले आहेत. ४५ आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. काँगेस राष्ट्रवादी आघाडी सरकारमधून बाहेर पडा असा थेट सल्लाच शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. महाविकास आघाडीत फक्त घटक पक्षांचा फायदा झाला शिवसैनिक भरडला गेला असे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केल होते.

या सगळ्या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनीही काँग्रेस व राष्ट्रवादीवर निशाणा साधत शरद पवार यांच्यावर टिका केली आहे.


Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या गटातील आमदाराचा मोठा खुलासा, फोनवरून सांगितली 'INSIDE STORY'
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज