अ‍ॅपशहर

मनसेचे वैभव खेडेकर हे पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता; अटकेची टांगती तलवार

Ratnagiri News Today : पोलिसांनी काल रात्रीपासून मनसे नेते वैभव खेडेकर यांचा शोध घेण्यासाठी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडे चौकशी देखील सुरू केली आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Oct 2022, 2:57 pm
रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस आणि खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गणेशोत्सवातील लॉटरी प्रकरणात वैभव खेडेकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार असून रत्नागिरीचे एलसीबी पथक सध्या खेडेकर यांचा शोध घेत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mns vaibhav khedekar 1
मनसे वैभव खेडेकर


अटकेची शक्यता निर्माण होताच वैभव खेडेकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी खेड न्यायालयात अर्ज केला आहे. उद्या शुक्रवारी यावर सुनावणी होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दरम्यान काल रात्रीपासून पोलिसांनी वैभव खेडेकर यांचा शोध घेण्यासाठी मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडे चौकशी देखील सुरू केली आहे. अटकपूर्व जामीन मंजूर न झाल्यास वैभव खेडेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

सुषमा अंधारेंच्या झंझावातामुळे बॅकफूटवर पडल्या, दीपाली सय्यद शिंदे गटाच्या वाटेवर?

दरम्यान, यापूर्वीच खेडचे माजी नगराध्यक्ष राहिलेल्या वैभव खेडेकर यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप ठेवत ६ वर्षांसाठी अपात्र करण्यात आले होते. विद्यमान मुख्यमंत्री आणि तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आदेश दिले होते. आता पुन्हा गणेशोत्सव स्पर्धेतील लकी ड्रॉ प्रकरणी खेडेकर यांचा पाय खोलात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महत्वाचे लेख