अ‍ॅपशहर

कोकणासाठी पावसाबाबत महत्त्वाची बातमी, हवामान खात्याने दिला मोठा इशारा

महाराष्ट्रातील बहुतेक भागांमध्ये अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. यामुळे अनेक शहरांमध्ये पाणी कपात सुरू असून शेतकऱ्यांच्या खरीपाच्या पेरण्याही रखडल्या आहेत. आता कोकणासाठी चांगली बातमी आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Jun 2022, 6:42 am
रत्नागिरी : हवामान खात्याच्या अंदाजानुसार १ व २ जुलै रोजी जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जून महिना संपत आला तरी कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तालुक्यात पावसाने तीस टक्केही सरासरी गाठलेली नाही. जिल्ह्याची एकूण सरासरी गेल्यावर्षी तुलनेत विचारात घेतल्यास आजवर ११६७.४४ मिमी पाऊस झाला होता. तर यंदा आजवर केवळ ५७६.२२ मिमी पाऊस झाला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम monsoon update in konkan maharashtra today
कोकणात १ आणि २ जुलैला अतिमुसळधार पावसाचा इशारा


रत्नागिरी जिल्ह्यात गेले चार पाच दिवस झालेल्या पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. यंदा फारच कमी झालेल्या पावसामुळे अजुन शेतीचे आवण फारसे न वाढल्याने लावण्याही रखडल्या आहेत.

दरम्यान, भारतीय हवामान खात्याच्या मुंबईतील कुलाबा येथी वेधशाळेकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान अंदाजानुसार २९ जून २०२२ ते ०१ जुलै २०२२ या कालावधीमध्ये दक्षिण महाराष्ट्र, कोकण, गोवा किनारपट्टीच्या ठिकाणी ताशी ४० ते ५० कि.मी. ते ६० कि.मी. वेगाने वादळी वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. मच्छिमारांनी या काळात समुद्रात जावू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.

कोकण रेल्वेचे कोट्यवधी खर्च वाचणार; 'या' कारणामुळे आता रेल्वेही घेणार वेग

२८ जून ते ०२ जुलै २०२२ या कालावधीत कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तरी नागरिकांनी सावधानता आणि सुरक्षितता बाळगावी. मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जावू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पावसाळा सुरु मात्र सहयाद्रीकडून येणाऱ्या नदया गाळातच !

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज