अ‍ॅपशहर

मुंबई-गोवा महमार्गावर केंटनर पलटला, केबिनमध्ये अडकून चालक जागीच ठार

हा कंटेनर वापी ते लोटे हायड्रो क्लोरिक ऍसिड हा ज्वलनशील नसलेल्या रासायनिक पदार्थ वाहतुक करत होता.

Maharashtra Times 22 Nov 2021, 12:09 pm
चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महमार्गावर रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात कशेडी इथं कंटेनर अवघड वळणावर पलटल्याने झालेल्या अपघातात चालकाचा केबिनमध्येच अडकून दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही घटना आज २२ नोव्हेंबर रोजी सोमवारी पहाटे ४वाजताच्या सुमारास घडली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai goa highway accident latest news


मृत्यू झालेल्या कंटेनर चालकाचे नाव वसीम आहे. पुर्ण नाव अद्याप कळू शकलेले नाही. हा कंटेनर वापी ते लोटे हायड्रो क्लोरिक ऍसिड हा ज्वलनशील नसलेल्या रासायनिक पदार्थ वाहतुक करत होता. MH 04 JK 7717 असा अपघातग्रस्त केंटनरचा क्रमांक आहे.

Mumbai Weather : मुंबईकरांनो कसं आहे आजचं हवामान? हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यामुळे नागरिक हैराण
या घटनेचे वृत्त कळताच तात्काळ खेडचे सहाय्यक निरीक्षक सुजीत गडदे, बोडकर,समल सुर्वे व खेड थील मदत ग्रूपच्या प्रसाद गांधी व कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या सहाय्याने केंटनर बाजुला करून चालकाला बाहेर काढण्यात आले. मात्र, त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. या घटनेची नोंद करण्याचे काम सुरु असुन अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.

महत्वाचे लेख