अ‍ॅपशहर

मोठी बातमी! मुंबई गोवा महामार्गावर आज अवजड वाहतूक बंद, हे आहे कारण

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी. आज दिनांक १६ एप्रिल रोजी महामार्गावर अवजड वाहनांची वाहतुक बंद असणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Apr 2023, 7:30 am
रत्नागिरीः अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र भुषण पुरस्काराने आज रविवारी सन्मानित करण्यात येणार आहे. हा गौरव सोहळा खारघर नवीमुंबई येथे आहे. या कार्यक्रमाला १५ लाख सदस्य खासगी वाहनांने, एसटी बसेसने येणार आहे. त्यामुळे १६ तारखेच्या रात्री बारा वाजेपर्यंत मुंबई- गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद आदेश देण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या दौऱ्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai goa highway news


या कार्यक्रमासाठी रायगड, रत्नागिरी, ठाणे, मुंबई, पुणे, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार वगैरे जिल्ह्यातून तसेच बाहेरील राज्यातून सुमारे १५ ते २० लाख सदस्य खाजगी वाहनांने, एसटी बसेस तसेच रेल्वेने खारघर नवी मुंबई येथे येणार आहेत. सध्या मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर चौपदरीकरणाचे कामकाज सुरू आहे. महामार्गावर बऱ्याच ठिकाणी बॉटलनेक पॉईट तयार झालेले आहेत.

मोठा दिलासा! मे महिन्यात करोना रुग्णांची संख्या घटणार, तज्ज्ञांनी सांगितलं महत्त्वाचं कारण
सलग तीन दिवस सुट्ट्या आल्याने नागरिक व पर्यटक तसेच सदस्य हे मोठया संख्येने वाहने घेऊन या मार्गावरुन प्रवास करणार आहेत. मुंबई-पुणे जुना राष्ट्रीय महामार्ग तसेच इतर राज्य मार्ग येथील वाळू/रेती भरलेल्या ट्रक, मोठे ट्रेलर्स तसेच अवजड वाहनांच्या वाहतुकीबाबत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
करोना रुग्णवाढीमुळे राज्य सरकार 'इन अ‍ॅक्शन मोड'; करोना लशींबाबत घेतला महत्वपूर्ण निर्णय
त्यामुळे कोकणात मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्गावरती प्रवास करणाऱ्या अवजड वाहनांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. आज रविवारी १६ एप्रिल रोजी रात्री बारा वाजेपर्यंत हा महामार्ग अवजड वाहनासाठी बंद असणार आहे.

महत्वाचे लेख