अ‍ॅपशहर

'त्या' बॅग स्वतःसाठी होत्या की मातोश्रीसाठी? निलेश राणेंचा विनायक राऊतांना सवाल

Nilesh Rane slam Vinayak Raut : भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांना राजेश क्षीरसागर यांच्या वक्तव्याचा दाखला देत सवाल केले आहेत. विनायक राऊत यांनी कोल्हापूरमध्ये मेळावा घेत क्षीरसागर यांच्यावर टीका केली होती. त्याला क्षीरसागर यांनी प्रत्युत्तर दिलं होतं.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Jul 2022, 8:31 am
रत्नागिरी : राज्यात सध्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे समर्थक यांच्यातील आरोप प्रत्यारोपांनी ऐन पावसाळ्यात चांगलीच धुळवड उडाली आहे. शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर त्यांना बॅगा द्याव्या लागतात असा गंभीर आरोप केला आहे. याच क्षीरसागर यांनी केलेल्या आरोपाचा धागा पकडून निलेश राणे यांनी विनायक राऊत यांच्यावर जोरदारपणे टीका करत कोकणचे नाव खराब केल्याची टीका केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Nilesh Rane Vinayak Raut
निलेश राणे विनायक राऊत


माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी खासदार विनायक राऊतवर गंभीर आरोप केले. विनायक राऊत निवडणूक असो व कार्यक्रम त्याला 'बॅग' द्याव्या लागतात. कोकणाचं नाव खराब केलं या माणसाने, त्या बॅग स्वतःसाठी होत्या की मातोश्रीसाठी हे विनायक राऊत यानी स्पष्ट करावे असे, ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.
....म्हणून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, संजय राऊतांची सनसनाटी मागणी

मुंबईतील गजबजलेल्या परिसरात दोन जणांची हत्या; शहरात खळबळ
कोल्हापूर येथे रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी शिवसेनेचा जिल्हा मेळावा घेतला. त्यावेळी त्यांनी शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर आरोप केले होते. या आरोपांना उत्तर राजेश क्षीरसागर यांनी विनायक राऊतांवर गंभीर स्वरूपाचा खळबळजनक आरोप केला. विनायक राऊत ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी पैसे घेतल्याशिवाय जातं नाहीत. निवडणूक असो किंवा कोणता कार्यक्रम असो त्यांची 'बॅग' तयार ठेवावी लागते असा आरोप क्षीरसागर यांनी केला आहे.

आता या सगळ्या आरोप प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत कोणती भूमिका मांडत या सगळयाला उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.

विनायक राऊत काय उत्तर देणार ?
शिवसेनेच्या ४० आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर विनायक राऊत, अरविंद सावंत, संजय राऊत हे पक्षाची बाजू जोरदारपणे मांडत आहेत. कोल्हापूरमधील मेळाव्यात विनायक राऊत यांनी सेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधला होता. आता, राजेश क्षीरसागर यांचे आरोप आणि निलेश राणे यांची टीका याला विनायक राऊत कसं उत्तर देतात हे पाहावं लागेल.
उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरून लढणार आरपारची लढाई; महाराष्ट्र पिंजून काढणार

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज