अ‍ॅपशहर

'तेजस'च्या प्रवाशांना अन्नातून विषबाधा

कोकण रेल्वेच्या सुपरफास्ट तेजस एक्स्पेसमधील २४ प्रवाशांना खाण्यातून झालेल्या विषबाधेमुळे त्रास जाणवू लागल्याने तातडीने एक्स्प्रेस चिपळून स्थानकात थांबवण्यात आली. बाधितांना तातडीने चिपळूनमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही एक्स्प्रेस मडगावहून मुंबई़कडे निघाली होती.

Maharashtra Times 16 Oct 2017, 3:20 pm
मटा ऑनलाइन वृत्त। रत्नागिरी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम passengers of tejas express got food poisoning admitted in hospital in chiplun out of which 15 passengers are serious
'तेजस'च्या प्रवाशांना अन्नातून विषबाधा


कोकण रेल्वेच्या सुपरफास्ट तेजस एक्स्पेसमधील २४ प्रवाशांना खाण्यातून विषबाधा झाल्याने एक्स्प्रेस चिपळून स्थानकात थांबवण्यात आली. बाधितांना तातडीने चिपळूनमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. उपचारानंतर सर्व बाधित प्रवासी सुखरूप असल्याचे हॉस्पिटलकडून सांगण्यात आले. ही एक्स्प्रेस मडगावहून मुंबईकडे निघाली होती.

तेजस एक्स्प्रेस ही देशातील सर्वात वेगवान एक्स्प्रेस आहे. तेजस एक्स्प्रेस दर रविवारी करमळीहून सीएसएमटीकडे रवाना होते. आजही तेजस आपल्या नियोजित वेळेप्रमाणे मुंबईच्या दिशेने निघाली. मात्र चिपळूनच्या जवळपास पोहोचताच अनेक प्रवाशांना त्रास जाणवू लागला. ज्यांना त्रास जाणवू लागला अशांची संख्याही मोठी होती. अन्नातून विषबाधा झाल्याचे लक्षात येताच तेजस चिपळून स्टेशनवर थांबवण्यात आली. त्यानंतर सुरुवातीला ५ ते ६ प्रवाशांना तातडीने चिपळून शहरातील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.

ज्यांना प्रवाशांना त्रास जाणवू लागला आहे, अशांची संख्या २४ पेक्षा अधिक असण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. ही विषबाधा नेमक्या कोणत्या अन्नातून झाली याचा तपास सुरू असल्याचेही सांगण्यात येत आहे.

तेजस एक्स्प्रेस ताशी २०० किमी वेगाने धावते. तेजस ही देशातील सर्वात जलद धावणारी एक्स्प्रेस आहे. तेजसच्या प्रत्येक डब्याच्या निर्मितीसाठी रेल्वेला ३ कोटी २५ लाख रुपये इतका खर्च आला आहे. या एक्स्प्रेसचे दरवाजे ऑटोमॅटिक आहेत. याबरोबच डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा, कॉल बेल, एलईडी टीव्ही, युएसबी चार्जिंग अशा अनेक अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. अशा अत्याधुनिक सुविधा असलेल्या एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना विषबाधा झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय आजच्या घटनेमुळे प्रवाशांचे आरोग्य आणि सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज