अ‍ॅपशहर

नागरिकत्व कायद्याविरोधात रत्नागिरीत विराट मोर्चा

नागरिकत्व कायदा रद्द करा, अशी मागणी करत हजारो नागरिकांनी रत्नागिरीत विराट मोर्चा काढला. या मोर्चात प्रचंड संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. रत्नागिरीतील हा गेल्या काही वर्षांतील सर्वात मोठा मोर्चा असल्याचे अनेकांनी सांगितले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Jan 2020, 8:37 am
रत्नागिरीः नागरिकत्व कायदा रद्द करा, अशी मागणी करत हजारो नागरिकांनी रत्नागिरीत विराट मोर्चा काढला. या मोर्चात प्रचंड संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. रत्नागिरीतील हा गेल्या काही वर्षांतील सर्वात मोठा मोर्चा असल्याचे अनेकांनी सांगितले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम caa


मोर्चात मौलवींसह मुस्लिम व हिंदू नागरिकांची मोठी उपस्थिती होती. खासदार हुसेन दलवाई, भालचंद्र मुणगेकर, हुस्नबानू खलिफे, हाजीफ नदीम सिद्दीकी, कुमार शेट्ये, मिलिंद कीर, तानाजी कुळ्ये, अभिजित हेगशेट्ये, बशीर मुर्तुजा आदींनी मोर्चाला मार्गदर्शन केले. मोर्चा अत्यंत शिस्तबध्द व शांततेत पार पडला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोर्चाला कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

जिल्हाभरातून हजारो नागरिक मोर्चासाठी रत्नागिरी शहरात दाखल झाले होते. 'नेहरू,गांधी, बाबासाहेब आंबेडकरवाला भारत हवा', 'हिंदू-मुस्लिम ऐक्याचा विजय असो' अशा घोषणा देत नागरिकत्व कायद्याचा निषेध करण्यात आला. मुस्लिम बांधव हातात तिरंगा घेऊन मोर्चात उतरले होते. रत्नागिरी शहरातील उद्यमनगर येथील चंपक मैदानावरून सकाळी १० वाजता मोर्चा निघाला. चर्मालय, गोडबोले स्टॉप, मारुती मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून माळनाका मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ धडकला. दिड कि.मी. लांबीचा हा मोर्चा लक्षवेधी ठरला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज