अ‍ॅपशहर

ये अंदर की बात है... शरद पवार हमारे साथ है; भाजपच्या आमदाराचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे भारतीय जनता पक्षासोबत आहेत. ही 'अंदर की बात' आहे, असा दावा भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी केला आहे. (Nitesh Rane on Farm bills)

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Sep 2020, 6:27 pm
कणकवली: महाविकास आघाडी सरकारमध्ये एक महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं कृषी विधेयकावर घेतलेल्या भूमिकेवरून विरोधकांनी सत्ताधारी आघाडीतील इतर पक्षांना डिवचलं आहे. 'ये अंदर की बात है, शरद पवार हमारे साथ है...' असा दावा भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम शरद पवार


केंद्र सरकारनं आणलेल्या नव्या कृषी कायद्याची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याला राष्ट्रवादी काँग्रेसनं विरोध केला आहे. नुकत्याच झालेल्या 'भारत बंद'मध्येही राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाली होती. कृषी विधेयकाला विरोध केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या खासदारांनाही शरद पवार यांनी पाठिंबा दिला होता. त्यासाठी पवारांनी एक दिवसाचा अन्नत्यागही केला होता. मात्र, या मुद्द्यावर राष्ट्रवादीनं संसदेत विरोधच केला नसल्याचं केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे.

वाचा: कांदा निर्यातबंदी हा घोटाळाच; शिवसेनेनं जोडला पाकिस्तानशी संबंध

कृषी विधेयकावरील चर्चेसाठी शरद पवार राज्यसभेत उपस्थितच नव्हते असा दावा काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यानंतर आता नीतेश राणे यांनी त्यापुढं जाऊन पवार साहेब आमच्यासोबत असल्याचं सांगत संभ्रम निर्माण केला आहे. 'राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल कृषी विधेयकावर बोलले खरे, पण त्यांनी विरोध केला नाही. त्यांनी केवळ सभात्याग केला,' असं नीतेश राणे म्हणाले.

वाचा: वरिष्ठांचा आदेश येताच अजित पवारांनी 'ते' ट्वीट डिलिट केलं!

शिवसेनेवरही त्यांनी तोफ डागली. 'शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचं कृषी विधेयकावरील भाषण तळ्यात-मळ्यात होतं. शिवसेनेला नेमकं कुठं जायचं आहे हे माहीत नाही. त्यांच्या नेतृत्वाला शेतीची काही माहिती नाही. त्यांचा पक्ष शेतीच्या प्रश्नावर कधीही भूमिका घेत नाही,' असंही नीतेश राणे म्हणाले.
वाचा: शिवसेना कधीच कन्फ्यूज नव्हती; राऊतांचे फडणवीसांना उत्तर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज