अ‍ॅपशहर

सिंधुदुर्ग जिल्हा हादरला; आमदार वैभव नाईक करोना पॉझिटिव्ह

गणेशोत्सव तोंडावर आला आहे. यामुळे कोकणातील चाकरमानी हे गणरायाच्या स्वागतासाठी तयारी करत आहे. अशातच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे जिल्हा हादरला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Jul 2020, 12:50 am
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: गणेशोत्सवासाठी मुंबईतील चाकरमानी कोकणात निघाले असताना सिंधुदुर्ग जिल्हा हादरला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम सिंधुदुर्ग जिल्हा हादरला; आमदार वैभव नाईक करोना पॉझिटिव्ह

कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी रात्री उशिरा त्यांचा अहवाल पॉजिटिव्ह आला आहे.

राज्यात करोनाचा विळखा अधिक घट्ट; दिवसभरात ८ हजार रुग्णांची भर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होतेय. अशातच सोमवारी रात्री शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांचा कोरोना अहवाल पॉजिटिव्ह आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आमदार वैभव नाईक हे या कोरोनाच्या स्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेषतः कुडाळ आणि मालवण या त्यांच्या मतदारसंघात नेहमी प्रवास करत असतात. सिंधुदुर्गनगरीमध्येही विविध बैठकांसाठी त्यांचा प्रवास असतो.

पुणे करोनाने झाले बेजार; २४ तासांत रुग्णसंख्येचा नवा उच्चांक
आमदार वैभव नाईक यांना भेटणाऱ्यांची संख्या ही फार मोठी असते. यामुळे आमदार वैभव नाईक यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा तसेच नागरिकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. आमदार वैभव नाईक यांचा जनसंपर्क फार मोठा असल्याने त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे हे आरोग्य यंत्रणे समोर आता आव्हान निर्माण झाले आहे.

महत्वाचे लेख