अ‍ॅपशहर

आदित्य ठाकरेंना मी फोन केला होता, पण...; योगेश कदमांनीही गंभीर आरोप करत 'मातोश्री'ला डिवचलं

Shivsena News : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनाही मी हा डाव ओळखा, असं सांगितलं. पण त्यांनी काहीही केलं नाही, असं योगेश कदम यांनी म्हटलं आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Sep 2022, 9:07 am
रत्नागिरी : दापोली येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सभेत शिवसेनेचे बंडखोर आमदार योगेश कदम यांच्यावर टीका करण्यात आली होती. या टीकेला रविवारी दापोलीत एकनाथ शिंदे गटाच्या भव्य मेळाव्यात आमदार योगेश कदम यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'जेव्हा कोकण संकटात होते, वादळाने हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाली होती, त्यावेळी मी आदित्य ठाकरे यांना फोन केला होता. आपण ही परिस्थिती बघा आणि तातडीने मदत करा, असं त्यांना सांगितलं. मात्र ते आले नाहीत. या आमदार योगेश कदमने १७ हजार कुटुंबांपर्यंत धान्य वाटप केले, सगळीकडे जाऊन पाहणी केली,' असं म्हणत कदम यांनी आदित्य ठाकरे यांच्याविरोधात हल्लाबोल केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Aditya thackeray yogesh kadam
आदित्य ठाकरे - योगेश कदम


'कोकणातील शिवसेना संपवण्याचा आणि कुणबी समाजात फूट पडण्याचा राष्ट्रवादीचा मोठा डाव होता. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनाही मी हा डाव ओळखा, असं सांगितलं. पण त्यांनी काहीही केलं नाही. दापोली नगरपंचायत निवडणुकीत अनिल परब यांनी इथे येऊन ढवळाढवळ केली आणि राष्ट्रवादीला बळ दिलं. साहेब तुम्हाला योगेश कदम नको होता तर तसं सांगायचं, मी दिला असता राजीनामा, पण शिवसैनिकांवर अन्याय कशासाठी केला?' असा सवाल आमदार योगेश कदम यांनी केला आहे.

Ramdas Kadam: नुसती दाढी वाढवून काय फायदा, लग्न तर करुन बघा, रामदास कदमांचा आदित्य ठाकरेंना टोला

आमदार कदम पुढे म्हणाले की, 'मी प्रामाणिकपणे काम करत होतो. माझी अडीच वर्षांची मुलगी हॉस्पिटलमध्ये होती, पण मी इकडे जाहीर सभा घेत होतो आणि मी पाठीत खंजीर खुपसला हा खोटा आरोप का करता? मी फोन केला तर तुम्ही नंतर बोलू असं सांगत होता. मात्र कधी फोन उचलला नाही,' असा आरोप त्यांनी दापोली येथील जाहीर सभेत केला.

दरम्यान, यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री रामदास कदम, आमदार भरत गोगावले, माजी आमदार अशोक पाटील, दीप्ती निखार्गे, भाजपचे केदार साठे, मकरंद म्हादलेकर, विजय जाधव, प्रदीप सुर्वे, निलेश शेठ आणि दापोली, खेड, मंडणगड येथील पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज